Nagpur : नागपुरातील जयताळा येथे आरक्षित जमिनीवर उभारलेले झोपडे काढताना तणाव वाढला आहे.  मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई सुरू करताच नागरिकांनी विरोध सुरू केला. रेणूका गृहनिर्माण सहकारी संस्थेजवळील 24 मीटर रूंद रस्त्यांसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर हे झोपड्या (Encroachment) उभारल्या होत्या. या झोपड्या हटवण्यासाठी आलेल्या पथकाला नागरिकांनी घेराव घातला. त्यानंतरही प्रशासनानं कारवाई करीत 19 झोपड्या हटवल्या. याचठिकाणी अवैधपणे शिवमंदिर उभारण्यात आले होते, सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारला होता. हे मंदिर आणि पुतळा हटवितांनाही जोरदार विरोध झाला. त्यानंतरही पथकाने कारवाई केली.  अशोक पाटील, सहायक आयुक्त किरण बगडे, आनंद लामसोंगे, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे आणि पथकाने ही कारवाई केली.


2 महिन्यापूर्वीच न्यायालयाचे आदेश


ही झोपडपट्टी हटविण्यासाठी मेसर्स मुकेश इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदा मुकेश तायवाडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन वर्ष चाललेल्या या याचिकेवर 17 ऑगस्टला न्यायालयाने आदेश दिले होते. त्यात अवैध बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले होते. सण, उत्सव असल्याने पोलीस बळ मिळत नसल्याने कारवाईला थोडा उशीर झाला होता. पथक मिळताच शुक्रवारला कारवाई करण्यात आली. 1 सप्टेंबर,2022 रोजी झोनने झोपडपट्टीवासियांना नोटीस देत 15 दिवसात जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर अतिक्रमण धारकांनी परत वेळ मागितला होता. मात्र, पथकाने नकार देत कारवाई केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'


Nagpur News : स्पॉट बुकिंगच्या नावावर एसटीत घोटाळा, शिवशाहीत प्रवाशांना चक्क शून्य पैशांचे तिकीट