Nagpur Sana Khan Case: नागपूर : राज्यासह (Maharashtra News) संपूर्ण देश हादरवणाऱ्या नागपुरातील (Nagpur Crime News) सना खान हत्या प्रकरणात (Sana Khan Murder Case) आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सना खान यांच्याकडे तीन मोबाईल फोन होते, त्यातील फक्त एकच मोबाईल पोलिसांना सापडला आहे, असा खळबळजनक दावा सना खान यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, सना खान यांचे इतर दोन फोन आरोपींनी लपवून ठेवले आहेत, ते दोन फोन पोलिसांनी शोधावेत, अशी मागणीही सना खान यांच्या आईनं केली आहे.
भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा एक मोबाईल फोन नुकतंच शोधण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. मात्र, सना खान यांचे आणखी इतर दोन मोबाईल फोन आरोपींनी नष्ट केलेले नाही. ते त्यांनी कुठेतरी लपवून ठेवले असल्याचा धक्कादायक खुलासा सना खान यांच्या आईनं केला आहे. विशेष म्हणजे, सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोप पत्र दाखल केलं असून त्यात आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सना खान यांचे दोन मोबाईल फोन आरोपींनी नष्ट केल्याचं पोलिसांनी नमूद केले आहेत. मात्र सना खानच्या आई मेहरूनिस्सा खान यांनी आरोपपत्रात नमूद गोष्टी सत्य नाही, त्या साफ खोट्या आहेत, असा दावा केला आहे.
मोबाईल नष्ट केलेल नाहीत, लपवलेत, पोलिसांनी शोधावं; सना खान यांच्या आईचा दावा
आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली असून सना खान यांचे इतर दोन्ही मोबाईल फोनही आरोपींनी अद्याप लपवून ठेवले असलयाचा आरोप करत पोलिसांनी ते शोधून काढावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपी अमित साहू आणि त्याचे सहकारी पोलिसांची सतत दिशाभूल करत आहेत. अमित साहूची नार्को एनालिसिस चाचणी केली, तर या संदर्भातील आणखी धक्कादायक तथ्य समोर येतील, असं सना खान यांच्या आईचं म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वीच पाच महिन्याच्या दिरंगाईनंतर नागपूर पोलिसांनी सना खान हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित शाहूच्या आईच्या घरातून एक मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले होते. त्यानंतर लगेच सना खानच्या आईनं सनाकडे एक नव्हे तर तीन मोबाईल फोन होते. इतर दोन्ही मोबाईल फोनही नष्ट करण्यात आलेले नसून ते कुठेतरी लपवून ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे.. त्यामुळे या मोबाईल फोनमध्ये नेमकं काय आहे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सना खान हत्या प्रकरण नेमकं काय?
सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या होत्या. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील हॉटेल व्यवसायिक अमित साहू उर्फ पप्पूसोबत त्यांची मैत्री होती. काही जण दोघांनी लग्न केल्याचाही दावा करतात. त्याच अमित साहूसोबत 1 ऑगस्टच्या संध्याकाळी सना खान यांचं व्हिडीओ कॉलवर जोरदार भांडण झालं. कधीकाळी अमित साहूला भेट म्हणून दिलेली सोन्याची चेन त्याच्या गळ्यात दिसून न आल्यामुळेच रागवलेल्या सना खान यांनी जबलपूरचा मार्ग धरला होता. सना खान या जबलपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरुप पोहोचल्याचं कळवलं होतं. पण, सनाने त्यांच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यादेखील पुन्हा परतल्याच नाहीत. त्यानंतर अमित साहूने हत्या केल्याची कबुली दिली होती. परंतु त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.