मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देश सध्या संकटात सापडला आहे. या काळात आपल्या सर्वांना एकांतात राहून देशसेवा करायची आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका. सध्या सकंटाचा काळ आहे, त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा. आपापल्या समाजाला दिशा देण्याचं काम प्रत्येकाने नागरिक म्हणून करावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते नागपुरात बोलत होते.



कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सध्या एकूण 40 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. काही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवेदन सादर केले. यावेळी एकांतात बसणे हीच राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकार आणि प्रशासनाचे सूचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर समाजाने उतावळे होऊ नये, असंही त्यांनी सांगितले.


..तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र


माथी भडकावणाऱ्यांपासून दूरू राहा
भय क्रोधापासून दूर राहणे, आवश्यक असल्याचे भागवत यांनी सांगितले. कारण, घाबरल्याने शत्रूचे मनोबल वाढते. तर, क्रोधाने तुमचे स्वास्थ बिघडेल. त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला भागवत यांनी दिला आहे. प्रत्येक समाजाच्या समजूतदार लोकांनी पुढे येऊन आपापल्या समाजाला दिशा देण्याचं करायला हवं. या काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करुन गर्दी करू नये. संघाचे सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या संकटाकाळात जे सेवा करत आहेत. त्यांनी ही सेवा निस्वार्थ भावाने करायला हवी. उपकाराच्या भावनेने कधी सेवाभाव होत नाही.


Uddhav Thackeray | मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


पालघर घटना दुर्दैवी
पालघरमध्ये दोन सांधूंची हत्या झाली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे भागवत म्हणाले. अशा घटनांमध्ये पोलिसांची भूमिका काय असावी हे महत्वाचं आहे. येत्या 28 एप्रिलला या साधूंना श्रद्धाजली देण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. भारताने जगभरात औषधांचा पुरवठा केला; ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आपल्या व्यवहारात, प्रेम, भावना, सेवा असायला हवी. ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहचवा. जे कोरोनाविरोधात लढत आहे, त्यांना साथ द्या. या काळात स्वयंशिस्त खूप महत्वाची आहे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संयम ठेवण्यासही त्यांनी सांगितले.


Police Drone Watch | लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी 50हून अधिक ड्रोन पोलिसांच्या मदतीला