Ramtekam Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Election 2024) शिंदे गटाचे नेते (Shinde Group) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आज अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर इकडे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) कळीचा मुद्दा ठरलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtekam Lok Sabha Constituency) बंडखोरीचा वाद शमण्यात ठाकरे गटाला यश आले आहे.


सुरेश साखरेंचा उमेदवारी अर्ज अखेर मागे 


रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश साखरे (Suresh Sakhare) यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार श्याम बर्वे यांच्या विरोधात बंड पुकारत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, मविआतील उच्चपदस्थ नेत्यांच्या सांगण्यावरून आता सुरेश साखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला असून नुकतेच ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहे. सुरेश साखरे यांनी आता आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्याने रामटेकमध्ये महाविकास आघाडीचा अर्धा जीव भांड्यात पडला असल्याचे बोलले जात आहे. 


आधी काँग्रेसवर सडकून टीका, नंतर माघार 


रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते सुरेश साखरे यांनी काँग्रेसवर  गंभीर आरोप केले होते. दरम्यान, काँग्रेसने रामटेकची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. रामटेक मधील उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याची पूर्ण कल्पना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना होती. तरी त्यांना उमेदवारी का देण्यात आली, असा सवाल सुरेश साखरे यांनी उपस्थित केला होता. तसेच, काँग्रेसकडे जिंकून येण्यासारखे इतर अनेक उमेदवार असताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी हट्ट करत रश्मी बर्वे यांनाच उमेदवारी का दिली. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघात संपूर्ण महाविकास आघाडीला अडचणीत आणेल, असा इशाराही सुरेश साखरे यांनी दिला होता.


काँग्रेस उमेदवाराला मोठा दिलासा


दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघातून सुरेश साखरे यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्याम बर्वे यांच्या विरोधात बंड पुकारत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या आजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सुरेश साखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी मविआतील उच्चपदस्थ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असता, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.


याविषयी भाष्य करतांना सुरेश साखरे म्हणाले की,  पक्षश्रेष्ठींनी मला फोन केला आणि आघाडी धर्माची आठवण करून दिली. महाविकास आघाडीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ नये, म्हणून मला वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. पक्षश्रेष्ठींनी पक्षावर आणि तुमच्यावर अन्याय झाला आहे असे मान्य केले. मात्र आघाडी धर्माची आठवण ही करून दिली. म्हणून मी त्यांच्या आदेशाचा पालन करत मी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे साखरे म्हणाले. आगामी काळात मी महाविकास आघाडीचा प्रचार करणार. मात्र ज्या पद्धतीने काँग्रेसने रामटेक मतदारसंघात राजकारण केलं त्यावर माझी नाराजी कायम असल्याचेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या