नागपूरः शाळांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत शिक्षण विभागाने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढवला आहे. यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकात विभागाने 11 ऑगस्ट ही रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर केली होती, मात्र इतर सुट्ट्यांवर शिक्षक संघटनांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाची सुटी रद्द केली. यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी 'अमृत महोत्सव रक्षाबंधन' कार्यक्रम घेतला जाणार आहे.


शिक्षण विभागाने 4 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 9 ते 16 ऑगस्ट दरम्यान आझादी अमृत महोत्सवाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. त्याअंतर्गत 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय गीत गायन स्पर्धा, 10 रोजी श्रमदान व शालेय स्वच्छता अभियान, 11 रोजी अमृत महोत्सव रक्षाबंधन, 12 ते 14 रोजी शालेय स्तरावर निबंध, व्याख्यान, भाषण आदी स्पर्धा, 15 रोजी स्वातंत्र्यदिन व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 16 ऑगस्ट रोजी आहे.


Bacchu Kadu Meets CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले, "थोडी नाराजी आहे, पण..."


सरकारी सुट्ट्यांवर निर्णय


अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सरकारी आणि स्थानिक सुट्ट्याही येत आहेत. पहिला दिवस म्हणजे 9 ऑगस्ट ही मोहरमची अधिकृत सुट्टी असते. 11 तारखेला रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी, 14 तारखेला रविवार आणि 16 तारखेला पतेतीची अधिकृत सुट्टी आहे, म्हणजेच 8 दिवसांत 4 सुट्या येत आहेत. या संदर्भात शिक्षक संघटनांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते त्यांचा अधिकार नसल्याने शासकीय स्तरावरील रजेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र 11 ऑगस्ट रोजी दिलेली रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी रद्द करण्यात आली. यासंदर्भातील परिपत्रकही सोमवारी जारी करण्यात आले.


लोकांच्या हितासाठी कायदा तोडण्याचा आमचा अधिकार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव


यंदा अमृत महोत्सवानिमित्त शहरात प्रशासकीय पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शैक्षणिक संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय सर्वांच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्या आले आहे.


Aamir Khan : आमिर खान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात नतमस्तक; 'लाल सिंह चड्ढा' च्या टीमसोबत प्रार्थना केली


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI