नागपूरः शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर च्या दंतपरिवेष्टन शास्त्रविभाग, यांनी इंडियन सोसायटी ऑफ पेरियोडॉन्टोलॉजीच्या सहकार्याने दिवंगत डॉ. जी. बी. शंकवालकर यांच्या जयंतीनिमित्त 1 आणि 2 ऑगस्ट 2022 या दोन दिवसांत मौखिक स्वच्छता दिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला. डॉ. जी. बी. शंकवालकर यांना डोयन ऑफ इंडियन पेरियोडॉन्टिक्स म्हणून ओळखले जाते. ते शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूरचे डीन आणि माजी प्राध्यापक होते.


या वर्षी मौखिक स्वच्छता दिनाचे आयोजन करिक्युलम एनरिचमेंट प्रोग्राम म्हणून दंतपरिवेष्टन शास्त्र विभागातर्फे 'दातांच्या काळजीसाठी हिरड्यांची काळजी' या विषय वर करण्यात आले होते. मौखिक स्वच्छतेबद्दल जागरुकता आणण्यासाठी आणि तोंडाच्या आजारापासून बचाव करण्याचे महत्त्व आणि त्यांचा प्रणालीगत स्थितीवर होणारा परिणाम याविषयी जनसामान्यांसाठी अनेक उपक्रम आणि चिकित्सकांसाठी वैज्ञानिक सत्रासह सामायिक करण्याच्या उद्देशाने हा साजरा करण्यात आला.


विद्यार्थीची मोफत दंत तपासणी 


ओरल हायजीन डे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर येथून अधिष्ठाता, प्राध्यापक सदस्य आणि विद्यार्थ्यांसह नवयुग प्रथमिक विद्यालय, राजबक्ष नागपूरपर्यंत स्वच्छता मोहीम/रॅली काढण्यात आली. दरम्यान सुमारे 300 विद्यार्थीच्या मोफत दंत तपासणी करण्यात आली. यानंतर वैज्ञानिक सत्र पार पडले. डॉ. विनय हजारे, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर च्या माजी डीन आणि मुखदंतविकृतीशास्त्र विभाग चे माजी प्राध्यापक होते. हे आमचे पाहुणे वक्ते होते,ज्यांनी दातांच्या काळजीसाठी गम केयर फॉर टूथ केयर – गोज मॉलेक्युलर या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. दुसऱ्या दिवशी रांगोळी, चित्रकला, घोषवाक्य लेखन, ई पोस्टर स्पर्धा आणि स्माईल स्पर्धा अशा विविध स्पर्धा, प्राध्यापक सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच स्वाध्याय-1 येथे दुपारी बक्षीस वितरण आयोजित केला होता. प्रसंगी डॉ. विनय हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्राध्यापक सदस्य, पदव्युत्तर, पदवीधर आणि इंटर्न यांच्याकडून तोंडी स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवणारे प्रयत्न यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.