नागपूर : नागपूरच्या शासकीय रुग्णालयातून एक बातमी समोर आला आहे. डॉक्टर नसल्याने स्वत:च्या हाताने प्रसूती करण्याची वेळ एका महिलेवर आली. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. सुकेशनी चेताने असं त्या महिलेतं नाव आहे. या प्रकरणात झालेल्या निष्काळजीपणाबद्दल शासकीय रुग्णालयाने तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे.

उद्या दुपारपर्यंत या समितीचा अहवाल येणं अपेक्षित असून या प्रकरणी आता खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करुन कारवाईचा निर्णय 3 दिवसात द्यायचे आदेश दिले आहेत.

Self Baby Delivery | डॉक्टर नसल्याने महिलेची स्वत:च्या हाताने प्रसूती, शासकीय रुग्णालयातला धक्कादायक प्रकार | नागपूर | ABP Majha



काल मध्यरात्री संबंधित महिलेला प्रसूतीकळा चालू झाल्या. डॉक्टरांनी तिला प्रसूतीकक्षात नेलं. मात्र प्रसूती होत नसल्यानं डॉक्टर निघून गेले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्या महिलेला पुन्हा प्रसूतीकळा सुरु झाल्या. महिलेचा आवाज ऐकून शेजारच्या वॉर्डमधून एक महिला धावत आली. परंतु त्याआधीच त्या महिलेची प्रसूती झाली होती.

या प्रसूती दरम्यान महिलेचे सलाईन पण निघून गेले, रक्त ही वाहू लागले अशी माहिती परिवाराने दिली. नंतर जवळ जवळ 4 तास महिलेला बाळासह जमिनीवरच झोपावे लागले. हे सर्व प्रकरण बाहेर येताच प्रशासनाने आता 3 सदस्यीय समिती गठीत करून चौकशीचे आदेश दिले आहेत