नागपूर : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जातात. महाराष्ट्राच्या विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीच्या 2 उमेदवार विजयी होऊ शकतात. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election) आयोगाकडून यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अजूनही कोणत्या राजकीय पक्षांनी याबाबत उमेदवारांबाबत घोषणा केलेली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार याबाबत प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा विधान परिषदेचा उमेदवार उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी उद्या संध्याकाळी बैठक बोलावल्याची माहिती ही प्रफुल्ल पटेल यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही कमी कालावधी राहिला असल्याचं ते म्हणाले.



राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा योग्य नाहीत.  सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर एकत्रित बसून पुढील मुख्यमंत्रीपदा संदर्भात निर्णय होईल. महायुती एकत्रितपणेच विधानसभा निवडणुकींना सामोरे जाईल, असा दावाही पटेल यांनी केला आहे. 


राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-1 टर्मिनलवरील छताचा भाग कोसळला होता. प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते. या प्रकरणात प्रफुल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.   दिल्ली विमानतळावर जे शेड पडले आहे ते 2008 - 09 मध्ये उभारण्यात आले होते पंधरा वर्षे पूर्वीच्या निर्माण कार्याबद्दल तेव्हा जो मंत्री होता त्याला जबाबदार ठरवणे योग्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल अशी प्रतिक्रिया तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.  प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांनी मांडलेल्या महाराष्ट्राच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. विरोधी पक्ष अर्थसंकल्पावर टीका करतच असतात, असंही ते म्हणाले.


दरम्यान, महायुती विधानपरिषेच्या 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवू शकते. भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीतून कुणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम


अधिसूचना जारी होणार : 25 जून 2024
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 2  जुलै
अर्जांची छाननी : 3 जुलै
अर्ज मागं घेण्याची तारीख : 5 जुलै 
मतदानाची तारीख : 12 जुलै  (9  ते 4 वाजेपर्यंत )
मतमोजणी : 12 जुलै  सायंकाळी 5 नंतर 


संबंधित बातम्या :


Maharashtra Politics : शिवसेनेच्या माजी आमदारानं भेटीचं ते वृत्त फेटाळलं, उद्धव ठाकरेंनाच दिलं मोठं आव्हान


राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य