Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून उनाड इच्छा विरुद्ध समाजहीत असा दारूचा प्रश्न आहे. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख कोटींची दारू फस्त केली जाते. महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाले आहे. मात्र, राजकारण आणि निवडणुका दारुवर विसंबून असल्याने मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा उठवल्या जात असल्याचा आरोप गडचिरोली येथील शोधग्रामचे पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी लावला. दारूमुळे कित्येक वर्ष समाजहीत धोक्यात आले आहे. मात्र दारूला शिक्षा कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असल्याची भावना बंग यांनी व्यक्त केली.


वर्धा (Wardha) येथील महात्मा गांधी साहित्य नगरी परिसरात सुरू असलेल्या 96व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात शनिवारी पार पडलेल्या प्रकट मुलाखतीत ते आपल्या भावना व्यक्त करत होते. आचार्य विनोबा भावे सभामंडपात पार पडलेली ही मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत यांनी घेतली. 


सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांवरही काही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यावर विशेष असा प्रकाश मराठी साहित्यिकांकडून टाकण्यात आलेला नाही. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात विविध विचारक, वेगवेगळे सेनापती इथे घडले. मात्र, या महाभारताचा वेध घेण्यात मराठी साहित्यिक अपयशी ठरले. हा इतका मोठा रंजक काळ ललित आणि बुद्धीनिष्ठतेने आता तरी सकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाष्ट्रातील ज्ञानोबा, तुकोबा, विनोबा हे सर्वकालिक महान साहित्यिक घडले. साहित्यिकांसाठी आनंदी, देहू आणि वर्धा हे साहित्य पंढरी व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. संचालन प्रा. अभय दांडेकर यांनी केले तर आभार रंजना दाते यांनी मानले.


आज साहित्‍य संमेलनात...


आचार्य विनोबा भावे सभामंडप



  • सकाळी 9.30 वाजता – डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत झाली

  • सकाळी 11 वाजता – भारतीय व जागतिक साहित्‍यविश्‍वात मराठीची ध्‍वजा फडकावणारे अनुवादक’ विषयावर परिसंवाद पार पडला

  • दुपारी 1.30 वाजता – कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक’ विषयावर परिसंवाद सरु झाला आहे.

  • दुपारी 3.30 वाजता – ‘मराठी साहित्‍यातील उद्यम व अर्थविषयक लेखन’ विषयावर परिसंवाद

  • सायं. 5.30 वाजता – मुक्‍त संवादमध्‍ये नागराज मंजुळे व कवी सौमित्र यांची उपस्‍थ‍िती रात्री 8.00 वाजता – निमंत्रितांचे कविसंमेलन 


मनोहर म्‍हैसाळकर सभामंडप



  • सकाळी 11.00 वाजता – ‘ग्रंथालय चळवळींचे यशापयश’ विषयावर परिसंवाद झाला.

  • दुपारी 1.30 वाजता – ‘स्‍त्री-पुरूष तुलना’ विषयावर परिचर्चा सुरु झाली आहे.

  • दुपारी 3.30 वाजता – ‘समाजमाध्‍यमांतील अभिव्‍यक्‍ती’ विषयावर परिसंवाद

  • सायं. 5.30 वाजता – ‘वैदर्भीय वाडमयीन परंपरा’ विषयावर परिसंवाद सायं. 7.30 वाजता – एकांक ‘गावकथा’


इतर कार्यक्रम 



  • सकाळी 9.00 वाजेपासून – स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर स्‍मृती वैदर्भीय काव्‍यनक्षत्रमाला

  • दुपारी 2.00 वाजता – वं. मावशी केळकर वाचन मंचाचे उद्घाटन


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'एक राष्ट्र हवेच, पण 'एकच भाषा' नको! संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर भाषणात स्पष्टच बोलले...