PM Narendra Modi : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (समृद्धी महामार्ग) Samruddhi Mahamarg पहिल्या टप्प्यातील नागपूर-शिर्डी या 521 किमी महामार्ग, नागपूर मेट्रोचे फेज 2 सह विविध प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) 11 डिसेंबर रोजी नागपुरात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सकाळी 9.25 च्या सुमारास ते नागपुरात (Nagpur) दाखल होणार आहेत. ते कस्तूरचंद पार्क ते खापरी या मार्गावर मेट्रोने प्रवास करणार असून त्यानंतर समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास करतील. त्यानंतर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बैठकांचा धडाका लावला आहे. दौऱ्याचे नियोजन करण्यात येत असून अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल नागपुरात दाखल झाले असून पंतप्रधान भेट देणाऱ्या ठिकाणी ते कसून चौकशी करीत आहेत. यासोबतच नागपूर मेट्रो (Nagpur Metro), रेल्वे (Railway) आणि एम्सच्या (AIIMS) अधिकाऱ्यांच्याही बैठकी सुरु असून तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. पंतप्रधानांचा मुख्य कार्यक्रम एम्स येथे होणार असून त्यासाठी सभामंडप तयार करण्यात आला आहे. सुमारे 30 हजार व्यक्ती कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचा अंदाज असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्यांचाही समावेश असणार आहे.


चार हजार पोलिसांचे सुरक्षा कवच; एसपीजी, फोर्सवन, एसआरपीएफ, शहर पोलिसांचा समावेश


पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे स्टेशन आणि महामेट्रोचा प्रवास करणार असल्याने यावेळी त्यांच्याभोवती 4 हजार पोलिसांचे सुरक्षा कवच तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पंतप्रधान तब्बल साडेतीन तास शहरात राहणार असून यादरम्यान ते शहरातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी सकाळी पंतप्रधान सकाळी शहरात दाखल होणार आहेत. यावेळी ते प्रथम सीताबर्डी येथील रेल्वे स्टेशनला जाऊन 'वंदे 'भारत' रेल्वे सेवेची सुरुवात करणार आहेत. यानंतर मेट्रोने खापरी आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाकडे प्रयाण करतील. या दरम्यान संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात येईल.


अनेक मार्ग राहणार बंद : वाहतूक व्यवस्थेत बदल


• रेल्वेस्टेशन मुख्यद्वार सामान्य प्रवाशांसाठी सकाळी 7.30 ते 11 पर्यंत बंद केले जाईल. त्यांना पूर्वेकडील द्वारातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.
•आरबीआय ते एलआयसी मार्ग बंद सदर ते जयस्तंभ चौकापर्यंतचा रस्ता बंद करण्यात येईल.
• रामझुल्यावरील रहदारीही या काळात बंद करण्यात येणार आहे
• लोहापूल ते मानस चौकांपर्यंतची वाहतूक बंद करण्यात येईल. 
• वर्धामार्गावरील उड्डाणपूलही बंद करण्यात येईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्राचा हिरवा कंदील; कन्हान, बुटीबोरी, कापसी, हिंगण्यापर्यंत विस्तार