नागपूर: पंचायत समिती आणि जिल्हा परिषद (ZP) स्तरावर बऱ्याच कालावधीपासून शिक्षक, शाळा व विद्यार्थी यांचे प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्याबाबत शिक्षण विभागाकडून (Education Department) प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार यांनी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांशी झालेल्या समन्वय सभेत दिले.
 
मागील काही काळापासून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व शिक्षक संघटना (Teachers Association) यांच्यात संघर्षाचे वातावरण असल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिक्षणाधिकारी यांनी नुकत्याच बोलविलेल्या एका सभेवर शिक्षक संघटनांनी बहिष्कार सुध्दा घातला होता. गैरवाजवी उपक्रम, प्रशिक्षण, दैनंदिन माहिती संकलन यासह अनेक अशैक्षणिक कामात  शिक्षकांना सातत्याने गुंतवल्या जात असल्याने शिक्षकांना अध्यापनास पुरेसा वेळच मिळत नाही असा शिक्षक संघटनांचा आरोप आहे. त्यामुळे 'आम्हाला फक्त शिकवू द्या' म्हणत शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. नुकतेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या (Maharashtra State Primary Teachers Committee) वतीने धरणे व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते तर अलिकडेच याच मुद्द्याला धरून सात संघटना नी मोर्चा (Protest March) काढला होता. याबाबीची दखल घेत शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेकडून शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते.


समन्वय सभेत शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन


माहितीचे संकलन शाळास्तरावरून होणार नाही. निवड श्रेणी मंजूरीबाबत शिबीरे, बिंदूनामावलीतील चुकांची दुरूस्ती, वरिष्ठ वेतनश्रेणी थकबाकी, वैद्यकीय परिपूर्ती, सेवानिवृत्ती प्रकरणे , शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व विषय पदवीधर शिक्षक  रिक्त पदावर पदोन्नती प्रक्रिया राबविणे  यासह अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समन्वय सभा आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही शिक्षणाधिकारी यांनी दिले. सभेला भास्कर झोरे, प्रमोद वानखेडे  लीलाधर ठाकरे, तुषार अंजनकर, सुनिल पाटील, नरेश भैस्वार, आशुतोष चौधरी, जुगलकिशोर बोरकर, संजय मांगे, वासुदेव जीवतोडे, विलास भोतमांगे  आदी उपस्थित होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या


New Rules From Today: आजपासून 'या' नियमांत बदल, ज्याचा परिणाम होणार तुमच्या खिशावर!


Maharashtra Rain : महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस, नाशिकसह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI