Know What is Changing From Today: आजपासून काही नियमांमध्ये बदल झाले आहेत. या बदलाचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यातील काही गोष्टी दिलासादायक आहेत. तर, काही गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. 


गॅस सिलेंडरच्या दरात कपात


आजपासून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयापर्यंत कपात झाली आहे. त्यामुळे रेस्टोरंट्स, हॉटेल्स आदींसह एलपीजी गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


पीएनबी खातेधारकांसाठी KYC आवश्यक


पंजाब नॅशनल बँक ग्राहकांसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. बँकेने KYC साठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे ज्यांनी ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांना बँकेतील खात्यातून आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येऊ शकतात. 


पीएम किसान योजनेत KYC नसल्यास पैसे मिळणार नाही


जर, तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहात आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही E-KYC केली नसल्यास तुम्हाला पुढील महिन्यातील रक्कम मिळणार नाही. केंद्र सरकारने या योजनेसाठी KYC  अनिवार्य केली आहे.  KYC प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येईल. 


विमा एजंटांचे कमिशन 


विमा प्राधिकरण IRDAI ने आजपासून आपल्या सामान्य विमा नियमांत बदल केला आहे. या नव्या नियमानुसार आता, विमा एजंटांना 30 ते 35 टक्क्यांच्या ऐवजी 20 टक्के कमिशन मिळणार आहे. त्यामुळे विमा घेणाऱ्यांना कमी प्रीमियम द्यावा लागेल. 


ऑडी कारच्या दरात वाढ


तुम्ही ऑडी कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. सप्टेंबर महिन्यांपासून ऑडीने आपल्या सर्व कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑडी कारच्या किंमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. कारच्या नवीन किंमती 20 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. 


यमुना एक्स्प्रेस-वे वर प्रवास महागणार


उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वे वरील प्रवास आजपासून महाग होणार आहे. टोलच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. ही टोल दरवाढ दुचाकी, तीन चाकी आणि शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर यांनी लागू नाही. नवीन दरांनुसार, आता कार चालकांना ग्रेटर नोएडा ते आग्रा या 165 किमीच्या एकेरी प्रवासासाठी 415 रुपयांऐवजी 437 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर हलक्या मालवाहू वाहनाला 635 ऐवजी 684 रुपये, ‘सिक्स एक्सल’ वाहनाला 1295 ऐवजी 1394 रुपये, अति जड वाहनाला 2250 ऐवजी 2729 रुपये मोजावे लागणार आहेत.