Nana Patole : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनींच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावं अशी 99 टक्के कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. लवकरचं काँग्रेसच्या अध्यक्षपादाची निवडणूक होत आहे. याबाबत नाना पटोलेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. कोरोनानंतर यंदा गणेश उत्सव मोठ्या जोमात साजरा केला जात आहे. महागाई कमी व्हावी, बेरोजगारी कमी व्हावी, अन्नदाता बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना गणरायाला केली असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. तसेच या गणशोत्सवाच्या राज्याच्या जनतेला शुभेच्छा देत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.


शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज


जगातला श्रीमंत माणूस (अडानी) देशात तयार होत आहे. त्यामुळं जी दरी देशात निर्माण होत त्यात कोणाची भागीदारी आहे. हे देशातल्या जनतेला समजत असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. आज गणेशोत्सव आहे. त्यामुळं मी राजकीय काही बोलणार नसल्याचे पटोले म्हणाले. पण लोकांना मी जे बोललो ते कळले आहे. शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. मात्र, गेल्या सात-आठ वर्षात हा प्रवाह थांबला आहे. कृत्रिम महागाई वाढवली आहे. त्यांना गणरायाने सद्बुद्धी देवो आणि महागाईपासून जनतेला वाचवावे एवढीच गणरायासमोर प्रार्थना करत असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. 


जनता पुन्हा काँग्रेसला आशिर्वाद देईल


राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. मनसे आणि भाजपा जवळ येत आहे, याबाबत देखील नाना पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पटोले म्हणालेकी, महाराष्ट्रात काँग्रेस हाच मोठा पक्ष होता, आहे आणि पुढच्या काळातही तोच राहणार आहे. काही लोकांनी काँग्रेसच्या चुका नसताना त्या चुका असल्याचे सांगत डोके फिरवली आहेत. मात्र, काँग्रेस पक्षच सर्वांना न्याय देऊ शकतो.  जनतेच्या जनमतावरच आमचा खरा विश्वास आहे. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनता पुन्हा काँग्रेसला आशिर्वाद देईल असा विश्वास नाना पटोलेंनी यावेळी व्यक्त केला. जिथे निवडणुका आहेत त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकल व्यवस्थेच्या आधारावर आम्ही लढू. त्यामुळं आता याबाबत चर्चा करण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणू निवडणूक लढू असे सांगितले आहे. याबाबतही नाना पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, याविषयी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवार यांचा तो विचार असेल असेही पटोले यावेळी म्हणाले. 


राहुल गांधींचा निवडणूक लढवण्यास नकार 


काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. यामध्येच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ज्यामुळे काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरचा असेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यातच तिरुअनंतपूरचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: