नागपूर: नोकरीच्या शोधात असलेल्या एका गरजू तरुणाला आपला रिझ्युम एका ऑनलाइन ॲपवर( Online Fraud ) अपलोड करणे चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन नोकरीच्या जाळ्यात ओढत या तरुणांची तब्बल 2.80 लाखांची फसवणूक झालीये. सायबर गुन्हेगाराने ( Cyber ​​Crime ) या तरुणाला  झटपट पैसा कमावण्याचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कच्या ( Telegram Task ) माध्यमातून जाळ्यात ओढले.  हा धक्कादायक प्रकार पाचपावली पोलीस ठाण्याच्या ( Nagpur Crime ) हद्दीत घडला. 


टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून फसवणूक 


सर्रास होणाऱ्या सायबर गुन्हात  ( Cyber ​​Crime ) दिवसागणिक वाढ होत आहे. ज्यामध्ये गुन्हेगारांच्या माध्यमातून नवनविन शक्कल लढवली जात असून त्यात सर्व वयोगटातील नागरिकांना फसविले जात आहे. असाच एक खळबळजनक  प्रकार नागपूरच्या ( Nagpur Crime ) पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. राणी दुर्गावती नगर येथील रहिवासी असलेला 34 वर्षीय  सूरजराज रमेशराव शेंडे असे या पीडित तरुणाचे नाव आहे. सूरजराज गेल्या काही काळापासून नोकरीच्या शोधत होता.


त्यासाठी त्याने अनेक नोकरी संबंधित ऑनलाइन साइटवर देखील शोध घेतला. त्यातीलच एका नोकरी संदर्भात असलेल्या अपना नाम या ऑनलाईन ॲपवर स्वतःचा रिझ्युम अपलोड केला होता. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने रिझ्युम वरील माहितीच्या आधारे सूरजराजशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.  3 नोव्हेंबर रोजी सूरजराजला एक अज्ञात व्यक्तीकडून फोन करण्यात आला आणि साईड एअर वर्ल्ड या कंपनीतून बोलत असल्याचे सांगण्यात आले.  'साईड नेटवर्क' या कंपनीत विमानाची तिकीटे बुक करण्याचे ऑनलाईन काम या कंपनीत असल्याची माहिती या व्यक्तीकडून देण्यात आली. त्यासाठी  अनेक आमिष देखील सूरजराजला दाखविण्यात आले. तसेच  या कामात पैसे लावल्यास जास्त नफा मिळेल असे देखील सांगण्यात आले. सूरजराजने  या कामावर विश्वास दर्शवला आणि या कामाला होकार दिला. 


 वेगवेगळ्या खात्यांवर वळते केले 2.80 लाख


 सूरजराजला सुरुवातीच्या काळात टेलिग्रामच्या माध्यमातून टास्क देण्यात आले. त्यातून त्याला नफा मिळत गेला आणि टेलिग्राम ॲपच्या खात्यावर रक्कम देखील पाठवली गेली. यावरुन सूरजराजचा विश्वास अधिक वाढत गेला आणि तो आधिक पैसे कमावण्याच्या नादात या कामात अधिक पैसे गुंतवू लागला. या प्रकरणात आमिष दाखवणाऱ्या  व्यक्तीने नंतर गुंतवणुकीवर आणखी नफ्याचे आमीष दाखवत वेगवेगळ्या खात्यांवर 2.80 लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्यावरुन सूरजराजने ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केली.


मात्र यावेळी सामोरच्या व्यक्तीने वेळेत कुठलीही  रक्कम  परत  दिला नाही. या प्रकरणी  सूरजराजने उलट विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तर देण्यात आली. सूरजराजने समोरील व्यक्तीला गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली असता आणखी पैसे भरावे लागतील असे त्याला  सांगण्यात आले. मात्र जवळ असलेली सर्व रक्कम गुंतवण्यात आली असल्याने सूरजराजला पर्याय नव्हता. म्हणून समोरील व्यक्तीला गुंतवलेले पैसे परत करण्याबात तकादा लावला असता समोरील व्यक्ती ही कुठल्याही कंपनीशी संबंधित नसून या प्रकरणात आपली फार मोठी फसवणूक झाली असल्याचे उघड झाले.


सायबर गुन्हेगारांने आपली फसवणूक केल्याचे लक्ष्यात येताच सूरजराजने तत्काळ पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील आरोपीचा  शोध सध्या पोलिस घेत आहे. 


हेही वाचा : 


Bhiwandi : शय्यासोबत करण्यासाठी आले आणि सेक्स वर्करच्या डोक्यात वरवंटा घालून हत्या केली, भिवंडीतील धक्कादायक घटना