Nagpur News : सिमेंट रोडच्या बांधकामाकरता लकडगंज झोन (NMC LAKADGANJ ZONE) अंतर्गत मेहता काटा चौक ते जलराम नगरपर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका (NMC) आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.


नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रिट रस्ते (Cement concrete road project) प्रकल्प अंतर्गत मेहता काटा चौक ते जलराम नगरपर्यंत सीमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने 15 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये उपरोक्त मार्गावरुन कोणत्याही वाहतुकीस उजव्या बाजूकडील मार्ग बंद करण्यात येईल. सदर मार्गावरुन डाव्या बाजूने वळवण्याबाबत मनपा आयुक्त (Nagpur Municipal Corporation) राधाकृष्णन बी. यांनी आदेश दिले आहेत. याशिवाय काम सुरु असलेल्या ठिकाणी महत्वाच्या उपाययोजना करण्याचेही आयुक्तांनी आदेश दिले आहेत. 


कंत्राटदाराला करावे लागणार याचे पालन...



  •  काम सुरु असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावणे

  •  काम सुरु झाल्याची व पूर्ण करण्याची दिनांक नमूद करणे

  •  कंत्राटदाराने स्वतःचे नाव व संपर्क क्रमांकाचे फलक लावणे

  •  पर्यायी मार्ग सुरु होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी तसेच बॅरिकेड्स लावणे

  •  बॅरिकेड्स जवळ सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावे

  •  वाहतूक सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हाचा पाट्या, कोन्स, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, एजईडी बॅटन, ब्लिकर्स आदी संसाधने उपलब्ध करावे

  •  काम सुरु झाल्यानंतर जमिनीतून निघणारी माती, गिट्टी आदी रस्त्यावर टाकू नये

  •  मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवावे

  •  पर्यायी मार्गाच्या ठिकाणी वळण मार्गाचे सविस्तर माहिती फलक लावणे

  •  रात्रीच्या वेळी एलईडी डायव्हर्शन बोर्ड लावणे

  •  बॅरिकेड्सवर एलईडी माळा लावणे 


या सह आदी वेळोवेळी दिलेल्या सूचनांबाबत काटेकोरपणे काळजी घेण्याचे सुद्धा महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


दिवसभरात अस्वच्छता पसरविणाऱ्या 215 प्रकरणांची नोंद


नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. या अंतर्गत शुक्रवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने 215 प्रकरणांची नोंद करून 86 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली. यात शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ही कारवाई केली.


हेही वाचा


Nagpur News: रस्त्यावर कचरा जाळणे मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना महागात पडले, दोघींना ठोठावला दंड