नागपूर: प्रधानमंत्री सक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-21 ते 2024 -25 या पाच वर्षाच्या कालावधीत 'एक जिल्हा एक उत्पादन' या आधारावर असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. योजेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे प्रमाण 60:40 आहे. या योजनेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याचा समावेश आहे. योजनेला व्यापक स्वरुप देण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट या कालावधीत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा साजरा केला जात आहे.


या पंधरवड्यात या प्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी, जिल्हा संसाधन व्यक्ती यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.  सर्व ग्राम सभांमध्ये कृषी सहायक योजनेची प्रचार प्रसिध्दी करतात. इच्छूक, पात्र व सक्षम लाभार्थींची आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेवून माहिती जिल्हा संसाधन व्यक्तीकडे सुर्पूद केली जाते.


योजनेचा लाभ मिळविण्यासाठी


16 ते 31 ऑगस्ट या कालावधीत बँकांकडे जे प्रकल्प आराखडे मंजूरीस्तव सादर केले आहेत त्याचे बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येवून लाभार्थ्यांचे कागदपत्रांची बँक अधिकाऱ्यासमक्ष पडताळणी करुन तुटींची पूर्तता करुन घेण्यात येईल. जिल्हा संसाधन व्यक्ती सर्व लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करुन जिल्हा नोडल अधिकाऱ्यांमार्फत विहित कार्यपध्दतीनुसार ऑनलाईन प्रस्ताव बँकेकडे कर्ज मंजुरीस्तव सादर करतील. जिल्हास्तरावरील प्रस्ताव प्रलंबित असणाऱ्या बँक, संबंधित कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यकती, बँक शाखा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल व  त्याचे संनियत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावे.


Nagpur : मद्यार्काची 'पुष्पा स्टाईल' तस्करी, दोन हजार लिटर 'स्पिरिट' जप्त


आजादी का अमृत महोत्सवांतर्गत रेशीम शेतीचे प्रात्यक्षिक


नागपूर: आजादी का अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने नागपूर तालुक्यातील देवळी गुजर येथे महेंद्र भागवतकर यांच्या शेतामध्ये वृक्षारोपण व तुती लागवडीचा कार्यक्रम आयोजित करुन अभिनव उपक्रम राबविला. रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, लेखाधिकारी शुभदा चिंचोळकर, रेशीम विकास अधिकारी विजय रायसिंग, भिमराव भालेराव, शिवाजी झोडे, गिरीधर शिंदे, रजनी बन्सोड, भास्कर उईके, महेंद्र भागवतकर, टेंभरे यावेळी उपस्थित होते. विदर्भामध्ये राज्य शासनाचे कोष खरेदी बाजारपेठ निर्माण झाले तर रेशीम शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. रेशीम शेतकऱ्यांची संख्या सुध्दा वाढेल, या शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करता येईल. देवळीगुजर परिसरात दोन वर्षात 100 एकर तुती लागवड वाढणार असे नियोजन तसेच संपूर्ण नागपूर जिल्हा रेशीममय होण्याच्या दृष्टीने रेशीम विभाग सदैव प्रयत्नशिल राहील, असे आश्वासन महेंद्र ढवळे यांनी दिले. रेशीम हे पीक हे प्रत्येक ऋतुमध्ये वेगळे असून कोणत्या ऋकुमध्ये पिकाची कशा पध्दतीने काळजी घ्यावी, काय उपाय योजना कराव्यात याबाबत माहिती विजय रायसिंग यांनी दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या पिकासंबंधी प्रश्नांचे निराकरण करुन मातृवृक्ष लागवडीचे फायदे सांगण्यात आले. या वेळी परिसरातील तुती लागवड क्षेत्राची पाहणी करण्यात आली.