नागपूरः जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील धरण्यांचे दरवाजे उघडावे लागले. पाण्याचा विसर्ग वेगाने वाढला. त्यामुळे जिल्हयातील अनेक तलाव भरले असून, यातील जवळपास 110 तलावांची तातडीने दुरूस्ती न केल्यास ते कधीही फुटू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. एकूण 470 तलावांपैकी 137 तलावांना अतिवृष्टीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. 15 ऑगस्टलाच उमरेड तालुक्यातील एक तलाव फुटला होता. तर, 14 जुलैला कुही तालुक्यातील देवळी खुर्द येथील एक तलावही फुटला होता.
जुलै महिन्यात विक्रमी पावसामुळे जिल्हयातील सर्वच तलाव ओव्हरफ्लो झाले होते. यातील 137 तलावांना मोठा धोका निर्माण झाला. तातडीने दुरूस्तीसाठी जिल्हापरिषदेच्या लघु सिंचन विभागाने 7.69 कोटीची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर आपत्कालीन निधीतून तात्पुरती दुरूस्तीकार्य करण्यात आले. मात्र, कायमस्वरूपी दुरूस्तीसाठी तलावांना 1.37 कोटीची गरज आहे. जि.प. सेस फंडातून तात्काळ निधी मिळावा यासाठी विभागाने प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हापरिषदेच्या विशेष सभेत याकडे कॉंग्रेसच्या गटनेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी लक्षही वेधले होते,हे विशेष.
निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे
अतिवृष्टीचा फटका 110 तलावांना मोठया प्रमाणात बसला आहे. त्यासाठी 7.69 कोटीचा निधीची गरज आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. वेळेच्या आत ही दुरूस्ती न केल्यास तलाव अत्यंत धोकादायक होऊ शकतात.
हळव्या बापाला न्यायालयाची साथ, मुलासोबत व्हिडीओ कॉलवर 40 मिनिटे बोलण्यास दिली परवानगी
पुनर्वसन विभागाकडेही प्रस्ताव
महाविकास आघाडीतील तत्कालीन पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपत्कालीन परिस्थीत मदत निधी म्हणून पुनर्वसन विभागात याबाबची तरतूद केली होती. मात्र, अद्यापही निधीची व्यवस्था करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेतून जिल्हाधिकारी कार्यालयात व नंतर विभागीय आयुक्तालयात प्रस्ताव जाईल. त्यानंतर अंतीम मंजुरीसाठी पुनर्वसन विभागात पाठविला जाईल. नवे सरकार यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
तलाव संख्या
- जिल्हयातील एकूण तलाव 470
- लघु सिंचन-134
- पाझर तलाव-60
- गाव तलाव-39
- मामा तलाव-214
- साठवन तलाव-24
RSS शस्त्रसाठा माहिती ; जिल्हा व सत्र न्यायालयाची नागपूर पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला
गळफास लावून दोघांनी संपविले जीवन
नागपूरः गळफास लावून दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना कपिलनगर आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. पहिल्या घटनेत कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी 3 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान म्हाडा क्वार्टर, बिल्डिंग क्र। 11, क्वार्टर नं. 176 येथील रहिवासी शैलेश अनिल गजभिये (वय 26) यांनी आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावला. तर दुसऱ्या घटनेत जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री 9.30 ते 12.15 च्या दरम्यान राणा एक्सोटिया अपार्टमेंट, बेझनबाग येथील रहिवासी हरिदास मुलचंद समुद्रे (वय 67) यांनी आपल्या राहत्या घरी अॅन्युमिनिअम फ्रेमच्या दाराला नायलॉन दोरी बांधून गळफास लावला.