नागपूर : रस्त्याच्या शेजारी लावलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यामुळे नागपुरात एका वयोवृद्ध व्यक्तीने चांगलाच गोंधळ घातला. रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी ठेवलेल्या जागेवर न पाहून हे वृद्ध तणावात आले. यावेळी गाडी जप्त केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी थेट टोईंग व्हॅनच्या समोरच ठिय्या मांडला आणि जोपर्यंत दुचाकी परत करत नाहीत तोपर्यंत गाडीसमोरुन न हटण्याचा पवित्र्या घेतला. 'माझी दुचाकी परत दे, नाही तर माझ्या अंगावरून ट्रक ने' असं हे आजोबा म्हणत होते. वयोवृद्ध नागरिकाच्या या पवित्र्यामुळे पोलिसही चांगलेत अवाक झाले. अखेर हे आजोबा गाडीसमोरुन न हटल्याने हतबल झालेल्या पोलिसांनी त्यांची दुचाकी परत केली. अद्याप या आजोबांचे नाव समजू शकलेले नाही.

या घटनेची नागपुरात चांगलीच चर्चा रंगली आहे. 65 वर्षीय आजोबांनी पोलिसांना मजबूर करत आपली दुचाकी सोडवून घेतली. काल मानेवाडा परिसरात वाहतूक पोलिसांसोबत फिरणाऱ्या टोईंगवाल्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी उचलून त्यांच्या ट्रक मध्ये ठेवल्या. त्यामध्ये या आजोबांची दुचाकीही उचलण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ 


आपली दुचाकी ठेवलेल्या जागेवर न पाहून हे वृद्ध तणावात आले. त्यांनी टोईंगवाल्यांचे ट्रक पाहून थेट त्याकडे धाव घेतली. त्या ट्रकमध्ये आपली दुचाकी पाहून त्यांनी दुचाकी परत मागितली. पोलिसांनी ती परत देण्यास नकार दिल्यानंतर आजोबा थेट आंदोलनावर उतरले. काही कळण्याच्या आत आक्रमक पवित्रा घेत आजोबा थेट टोईंगच्या ट्रकच्या समोर जाऊन चक्क झोपले. या प्रकाराने पोलिस देखील गोंधळून गेले.

Nagpur traffic | नागपूर ट्रॅफिक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद 


'माझी दुचाकी परत दे, नाहीतर माझ्या अंगावरून ट्रक ने' असं आजोबांचं म्हणणं होतं. यावेळी पोलिसांनी आजोबांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र, आजोबा काही उठायला तयार झाले नाहीत. अखेरीस पोलिसांना आजोबांची दुचाकी परत द्यावी लागली. मग आजोबांनी पोलिसांना धन्यवाद देत तिथून आपली वाट धरली.

Special Report | नागपुरात अलिशान गाड्यांमधून गायींची चोरी, धक्कादायक सीसीटीव्ही कैद