OBC Reservation : मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील आमरण उपोषण (Manoj Jarange Patil Azad Maidan Protest) आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. "आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्याशिवाय उठणार नाही," अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतल्यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे. दरम्यान, जरांगे यांच्या मागण्यांमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम म्हणून आता नागपुरात आजपासून ओबीसी महासंघाकडून (OBC Mahasangh) साखळी उपोषण करण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचं चित्र आहे. नागपूरच्या संविधान चौकात आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरूवात होणार आहे. या साखळी उपोषणाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार असून, हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत काळासाठी सुरू करण्यात आलं आहे.

प्रमुख मागण्या काय?

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्पष्ट केलं आहे की, मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत आरक्षण देऊ नये, तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रही देऊ नये, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचप्रमाणे, मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी राज्य सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वासनाबाबत लेखी हमी द्यावी, अशीही ठाम मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.

Continues below advertisement

...तोपर्यंत साखळी उपोषण मागे घेणार नाही

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी साखळी उपोषण केले जात आहे. मराठा आरक्षणाचा विचार करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय साखळी उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. आता राज्य सरकार यावर नेमका काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

उपोषणाला 10 ते 3 वाजेपर्यंतच परवानगी

दरम्यान, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला पोलिसांनी सकाळी 10.00 ते 3.00 वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. ओबीसी महासंघाने पोलिसांची ही विनंती मान्य केल्याची माहिती समोर येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maratha Reservation Manoj Jarange: मुंबईतील पावसामुळे आझाद मैदानात चिखल, शौचालयात पाणी संपलं, बिसलरीच्या बॉटल आणून...

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी जाणून घेतली मराठा आंदोलनाची माहिती; विनोद तावडे यांच्याशी मुंबईत चर्चा, बैठकीत नेमकं काय ठरलं?