नागपूरः शहरात अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन होत असतात.  सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला आधार कार्ड दाखवण्यात काही गैर वाटत नाही. आयोजकांना माहिती हवं की कोण आपल्या कार्यक्रमात येतोय. मात्र याला धार्मिक रंग देऊन दोन समुदायामध्ये द्वेष पसरविण्याची ही वेळ नसून प्रत्येक व्यक्ती समजदार आहे आणि त्याला सर्व गोष्टी कळतात, अशी प्रतिक्रिया नागपूरच्या तरुणांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. यावेळी अनेक तरुण दरवर्षी नवरात्रीपूर्वी गरबा कार्यशाळेत जाऊन विविध गाण्यांवर नव-नवीन स्टेप्स शिकून नऊ दिवस विविध गरबा आयोजनांमध्ये गरबा करण्यासाठी जातात.


दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय. तसेच विविध गरबा कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र गरबा बघण्यासाठी येणाऱ्यांचे आधार कार्ड (Adhar Card) तपासून एका धर्माच्या लोकांना प्रवेश देऊ नका, अशी चर्चा करणेही चुकीचे असल्याचे मत तरुणाईने व्यक्त केले.


यावेळी बोलताना वैष्णवी बिजवे म्हणाल्या, 'आपण अनेक ठिकाणी जातो. त्याठिकाणच्या सुरक्षिततेसाठी आपली ओळख दाखवावी लागते. एअरपोर्ट (checking aadhar card for security) असो किंवा शासकीय कार्यालय किंवा रेल्वे यातही ऑनलाइन बुकिंग केल्यावरही ओळखपत्र दाखवावे लागते. यात काही गैर नाही.'


यासंदर्भात बोलताना विद्यार्थीनी पूनम रेवतकर म्हणाली, 'आपण एकविसाव्या शतकात आहोत. आता जात धर्म याच्या पलिकडे तरुणाई गेली आहे. आज प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मित्रांसोबत त्यांचे सण साजरे करतो. त्यामुळे कुठलेही उत्सव फक्त एका समुदायापुरते (youth don't believe in caste system) मर्यादित नाही आहे. मात्र यावर राजकारण करणे चुकीचे आहे.'


आदर्श शुक्ला म्हणाला, 'कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात काही मुठभर लोकं येतात. त्यांचे कार्यक्रमात येण्याचे उद्देश हे चांगले नसते. मात्र कोणाची जात, किंवा धर्म बघून त्याचा उद्देश काढणे (we cannot judge anyone on basis of religion) शक्य नाही आहे. यामुळे दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल. यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन अशा लोकांवर अंकुश लावावा.'


रेणूका पचगाडे म्हणाली, 'सार्वजनिक कार्यक्रमात जाताना कोण कशा नजरेने बघतो, त्याची जाण तरुणींना असते. तसेच मुली या समजदार असतात. त्यांना बरं वाईट कळतं. त्यामुळे विनाकारण यावर राजकारण करण्याची गरज (No politics in Garba event) नाही. मात्र आयोजकांना त्यांच्या कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी कोण येतोय याची माहिती व्हावी म्हणून ओळखपत्र बघून नोंदणी केल्यास यात काही गैर नाही.'


सिया जांगिड म्हणाल्या, 'एखाद्या सण-उत्सवाच्या नावावर राजकारण करणे चुकीचे आहे. आज मुली समजदार आहे. त्यांना समाजात काय सुरु आहे. याची कल्पना आहे. मात्र कुठल्याही गोष्टीला धार्मिक रंग (religious issues) देणे मला योग्य वाटत नाही.'


अमन पराते म्हणाला, 'कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करताना त्यात गैरप्रकार घडू नये, याची जबाबदारी आयोजकांची असते. त्यामुळे आपल्या कार्यक्रमात येणाऱ्यांबाबत आयोजकांना माहिती असावी यासाठी त्यांनी काय अटी ठेवाव्यात, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल कोणी काही म्हणेल म्हणून तसं केलं जाईल असं होऊ शकत नाही'.


याबद्दल बोलताना गरबा शिक्षिका तोषिता खोपडे म्हणाल्या, 'आम्ही मागील अनेक वर्षांपासून गरबा प्रशिक्षणाचे आयोजन करतो. आमच्याकडे सर्व धर्म, समुदायाचे लोकं गरबा शिकण्यासाठी येतात. एक शिक्षिका म्हणून माझ्यासाठी प्रत्येक शिकणारा हा सारखाच आहे. आमच्या नवरात्री पूर्वीच्या गरबा कार्यशाळेनंतर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी गरबा कार्यक्रमाचेही आयोजन करतो. त्यामुळे त्यात आम्ही भेद करु शकत नाही.'


इतर महत्त्वाच्या बातम्या


Navratri Health Tips : नवरात्रीच्या उपवासात 'या' चार फळांचा समावेश करा; दिवसभर उत्साही राहाल


Navratri 2022 : साडेतीन शक्तीपीठांसह राज्यभरातील देवींची प्रसिद्ध मंदिरं, ज्या ठिकाणी भक्तांचा मेळा भरतो