नागपूरः राज्यातील अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी (Pharmacy), हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) आणि कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या एमएचसीईटी परीक्षेत अदिती टेंभर्णीकर आणि सच्चित काळे यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. दोघांनाही 100 पर्सेटाइल मिळाले आहे. विशेष म्हणजे यादीत 7 हून अधिक विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत.
पीसीएम गटातून 100 पर्सेटाइल मिळविणाऱ्यांमध्ये सच्चित आणि शरयू यांचा तर पीसीबी गटातून आदिती आणि नीरज यांचा समावेश आहे. पीसीएम गटात अकोल्याच्या वेदांत तायडे याने 99.99 पर्सेटाइलसह इतर मागासवर्गीयमध्ये प्रथम स्थान मिळविले. बुलढाणा येथील प्रसन्ना नागे याने 99.97 पर्सेंटाइलसह भटक्या जमातींमध्ये प्रथम नागे याने 99.97 पर्सेंटाइलसह भटक्या जमातींमध्ये प्रथम तर अमरावतीच्या वेदांत पारखे याने 99.96 पर्सेटाइलसह द्वितीय स्थान मिळविले. पीसीबी गटात अकोल्याच्या साकार बांडे याने 99.94 पर्सेंटाइलसह इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम तर अकोल्याच्याच भाग्यश्री बिलबिले हिने 99.99 पर्सेंटाइलसह द्वितीय स्थान मिळविले आहे. नागपूरच्या प्राजक्ता लिहितकर हिने अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 99.99 पर्सेंटाइलसह प्रथम तर साक्षी मेश्राम हिने 99.96 पर्सेंटाइलसह द्वितीय स्थान मिळविले आहे. नागपूरच्याच खुशी रणदिवे हिने अनुसूचित जमाती गटातून 99.93 पर्सेंटाइलसह प्रथम स्थान मिळविले आहे.
आंबेडकर महाविद्यालयाची भरारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून (Dr. Ambedkar College) 99 टक्क्यांसह अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी विनोद (पीसीएम) 99.81 टक्के, प्रथमेश कौटिकवार (पीसीएम) 99.89 टक्के, वेदांत मारोडकर (पीसीएम) 99.26 टक्के, आयुष बोकडे (बीसीएम) 99.70, राहुल गुप्ता (पीसीएम) 99.68 टक्के, मैथिली रेवतकर (पीसीएम) 99.64 टक्के, आयुष खरेय्या (पीसीएम) 99.63 टक्के, मैत्रेयी घनोटे (पीसीएंम) 99.59 टक्के, आर्यन उके (पीसीएम) 99.19 टक्के, नेहाल अग्रवाल (पीसीएम) 99.03, अर्कजा देशमुख (पीसीएं) 98.22 टक्के, तनुष लिचाडे (पीसीएम) 96.11 टक्के, शिवेन अग्रवाल (पीसीएम) 96.09 टक्के, रिषी मिश्रा (पीसीएम) 96.02 टक्के, प्राची भोयर (पीसीबी) 96 टक्के, ऋतुजा कोल्हे (पीसीबी) 96 टक्के गुण मिळविले. यावेळी अदिती टेंभुर्णीकर, मैत्रेयी घनोटे, मैत्रेयी रेवतकरचा सत्कार डॉ. सुधीर फुलझेले, प्राचार्य डॉ. बी.ए. मेहेर यांच्याहस्ते करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ कायमचा बंद होणार? शिक्षणमंत्र्यांच्या विचाराबद्दल तज्ज्ञांना नेमकं काय वाटतं...
High Court : देशसेवा, राज्याबाहेर बदल्या होणाऱ्या पालकांच्या मुलांना 'त्या' अटीतून दिलासा, उच्च न्यायालयाकडून स्पष्ट
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI