नागपूर : नागपुरात राहत्या घरी मृतावस्थेत आढळलेल्या वृद्ध बहीण-भावाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. भावाच्या मृत्यूच्या दोन-तीन दिवसांनंतर बहिणीने प्राण सोडल्याचं पोस्टमार्टम अहवालात म्हटलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातील पाळीव कुत्राही मृतावस्थेत सापडला.
नागपुरात 15 जानेवारीला संध्याकाळी तात्या टोपे नगरमधील राहत्या घरी दोन वृद्ध मृतावस्थेत आढळले होते. 80 वर्षीय मोहनलाल ओटवाणी आणि त्यांची 75 वर्षीय बहीण शांता ओटवाणी यांचे मृतदेह आतून लॉक असलेल्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते.
पोस्टमार्टम रिपोर्टमधील माहितीनुसार मोहनलाल यांचा मृत्यू आधी झाला, तर त्यानंतर दोन दिवसांनी बहीण शांता ओटवाणी यांनी प्राण सोडले. म्हणजेच वृद्ध महिला आपल्या भावाच्या मृतदेहासोबत घरीच होत्या. बहिणीचा मृत्यू तहान-भुकेमुळे झाल्याचं समोर आले आहे. म्हणजे भावाच्या निधनामुळे धक्का बसल्यानंतर बहिणीने अन्न-पाण्याचा त्याग केल्याची शक्यता आहे.
ओटवाणी यांच्या घरी पाळीव कुत्राही मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या उत्तरीय तपासणीतही त्याचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचं कारण समोर आलं आहे. या दोन्ही भाऊ-बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये असल्याचंही समोर आलं आहे.
वृद्ध भावाच्या मृत्यूनंतर बहिणीने प्राण सोडले, कुत्राही मृतावस्थेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2019 10:32 AM (IST)
नागपुरात दोन वृद्ध नागरिक 15 जानेवारीला संध्याकाळी राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. भावाच्या मृत्यूच्या दोन-तीन दिवसांनंतर बहिणीने प्राण सोडल्याचं पोस्टमार्टम अहवालात समोर आलं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -