Nagpur Accident : नागपूरच्या रामझुला ओहरब्रिजवर एक महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी गेला आहे. नागपूरच्या तहसील पोलीस (Nagpur Police) ठाण्याच्या हद्दीत शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.  या घटनेत काळ्या रंगाच्या मर्सडिज मध्ये असलेल्या महिलेने अंत्यत वेगात रॅश ड्राईव्ह करत दुचकीला धडक दिली.


हा अपघात इतका भीषण होता की, यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन (Rash Driving)अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी हे उच्चभ्रू परिवारातल्या असल्याने पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, घटनेच्या वेळी दोन्ही महिला दारू पिऊन असल्याचा दावा देखील पीडित कुटुंबाचा आहे. पोलिसांनी दोन्ही महिलांची वैद्यकीय तपासणीकडून रक्ताचे नमुने घेतले. मात्र संशयित आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत जामीन मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.


भरधाव करने घेतला दोन तरुणांचा बळी


बेजबाबदारपणामुळे दुसऱ्यांच्या जिवाचीही पर्वा न करता भरधाव करने दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी घेतला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली. मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34, रा.नालसाहब चौक) आणि  मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (34, रा. जाफरनगर, अवस्थी चौक) असे मृतांचे नाव आहे. तर माधुरी शिशिर सारडा (37, वर्धमान नगर) आणि रितिका ऊर्फ रितू दिनेश मालू (39, रा.देशपांडे ले-आउट) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. हुसेन आणि त्याचा मित्र आतिफ हे दोघे आपल्या दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, शनिवारच्या रात्री दीड वाजताच्या सुमारास हे दोघे रामझुल्यावरून जात असतांना सदर कडून आलेल्या एका मर्सडिज कारने (कार क्रमांक. एमएच 49 एएस 6111) त्यांना मागून धडक दिली. या कारचा वेग इतका जास्त होता की, दोन्ही दुचाकीस्वार अनेक फूट दूर फेकले गेले. दरम्यान हुसेन आणि आतिफ हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी तत्काळ या दोन्ही जखमींना जवळच असलेल्या मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मोहम्मद हुसेनला उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


संशयित आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत जामीन


या प्रकरणी मोहम्मद हुसेनचा भाऊ इफ्तेखार निसार अहमद (48, रा. हंसापुरी) यांनी तत्काळ तहसील पोलीस स्टेशन गाठत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांनी अटक करून महिलांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणातील संशयित आरोपी हे उच्चभ्रू परिवारातल्या असल्याने पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, घटनेच्या वेळी दोन्ही महिला दारू पिऊन असल्याचा दावा देखील पीडित कुटुंबाचा आहे. पोलीसांनी दोन्ही महिलांची वैद्यकीय तपासणीकडून रक्ताचे नमुने घेतले. मात्र संशयित आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत जमीन मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या