Nagpur Crime : नागपूरच्या राजनगर परिसरात शनिवारी भरदिवसा झालेल्या गोळीबार (Nagpur Crime) प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. फ्रीलान्सर छायाचित्रकार विनय पुणेकर यांच्या हत्येचा तपास करत असतांना पोलिसांना (Nagpur Police) या प्रकरणात एका महिलेचा हात असल्याचा संशय आला. यात तिला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. साक्षी ग्रोव्हर (32, रा. मानकापूर) असे या संशयित आरोपी(Crime)महिलेचे नाव आहे. तर या प्रकारणातील तिच्या प्रियकर हेमंत शुक्ला (वय 35, रा.आझमगढ, उत्तर प्रदेश) असे फरार मारेकऱ्याचे नाव असून पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत. विनय ऊर्फ बबलू पुणेकर यांचे प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या संशयातून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. 


कॉल रेकॉर्डवरून सत्य आलं समोर 


उपराजधानी नागपूरात हत्यांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या 24 दिवसात शहरातील विविध भागात 16 हत्येच्या घटनांनी शहर हादरले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना नागपूरसाठी हत्त्यांचा (Nagpur) महिना ठरला आहे. अशीच एक हत्येची घटना शनिवारच्या  दुपारी नागपूरच्या सदर पोलीस (Nagpur Police) स्टेशनच्या हद्दीतील राजनगर परिसरात घडली. यात अज्ञातांनी घरात घुसून एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. यात विनय ऊर्फ बबलू पुणेकर यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असून त्यांचा या हल्ल्यात जीव गेला. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने नागपुरात पुन्हा मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, यात परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. यात एक तरुण संशयितरित्या आढळून आला. विनय यांच्याशी संबंधित लोकांनी  या तरुणाला कधीच पाहिले नव्हते.


दरम्यान तो अनोळखी तरुण बाहेरील असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी विनय यांचा फोन तपासला. त्यातील कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना साक्षी ग्रोव्हर हिच्याशी संपर्क झाल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी साक्षीचा शोध घेत रविवारी तिला ताब्यात घेतले. तिला विचारणा केली असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी जरा दम दिल्यावर तिने हत्येत सहभागी असल्याची कबुली दिली. साक्षी आणि विनय अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे देखील तिने सांगितले. 


दहा वर्षांपूर्वी आली होती संपर्कात


फेब्रुवारी महिन्यात नवे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारताच नागपूरात एका पाठोपाठ एक हत्येच्या घटना घडत आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांना या हत्येच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी पोलिसांनी या हत्येचा तपास जलद गतीने केला असता, या हत्येमागील संशयितांपर्यंत पोहचण्यात सदर पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान विनय यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले असता, यात साक्षीनेच विनय यांच्याशी शेवटचा संपर्क साधल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतले. या हत्येच्या कटात साक्षीचा प्रियकर हेमंत हा घरात गेला होता, असे तिने पोलिसांना सांगितले. हेमंतच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक आझमगढला रवाना झाले आहे. दहा वर्षांपूर्वी तरणतलावावर साक्षीची विनय यांच्यासोबत ओळख झाली होती, असे देखील तिने पोलिसांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या