नागपूर: नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा चीर दिवसापासून शोध लागला नाही. शासनाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. चार दिवस उलटूनही शोध लागेना. तहशीलदाराची हतबलात बघून नागरिक देखील चक्रावून गेले आहेत. शोध कार्यासाठी यंत्रणा अपुऱ्या पडल्या आहेत. नागपूरची (Nagpur News) बचावकार्य करणारे पथक कधी येणार याची आशा गावकऱ्यांना लागली आहे. बुधवारपासून ड्रोनच्या माध्यमातून तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.(Nagpur News) 

Continues below advertisement


रात्रंदिवस त्या तरुणाचा शोध सुरू


चार दिवसापूर्वी जाम नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही. तरुणाचा शोध घेण्यासाठी  स्थानिक पातळीवरील सर्व उपाय योजना करण्यात आल्या असून तरुणाचा शोध लागला नाही. बुधवारी ड्रोनच्या माध्यमातून तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु यश मिळाले नाही. पोलिस विभाग व महसूल विभाग रात्रंदिवस त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तरुणाचा काही शोध लागत नाही. शासनाच्या शोध कार्य करण्यासाठी उपाय योजना कमी पडत असल्यामुळे वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागत नसल्याची मोठी चर्चा सुरू आहे. 


स्थानिक पातळीवर सुरू असलेले पर्यंत अपुरे


चार दिवस उलटून सुद्धा अजून पर्यंत नागपूर येथील बचाव कार्य कारणांरे पथक आलेले नाही. स्थानिक पातळीवर सुरू असलेले पर्यंत अपुरे पडत आहे. असे असताना सुद्धा शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. १५ सप्टेंबर रोजी जाम नदीच्या पुरात वाहून गेलेल्या  तरुणाचे नाव प्रवीण कवडेती (वय २७, रा. तो नारसिंगी) येथील रहिवाशी आहे. ठाणेदार तुषार चव्हाण यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू ठेवली आहे. आता या कामात ड्रोनचा वापर करून सुद्धा प्रवीण शोध लागला नाही. त्यामुळे गावात मोठे तणावाचे वातावर निर्माण झाले आहे. 


प्रवीण अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  चार दिवसांच्या प्रयत्नांनंतरही प्रवीणचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. प्रवीणचा शोध घेण्यासाठी तातडीने नागपूर येथील बचाव पथकाला पाचारण करण्याची मागणी होत आहे. तहसीलदार  यांनी जिल्हाधिकारी यांना घटनेची माहिती देऊन बचाव पथकाची मागणी केली आहे. परंतु चार दिवस उलटून सुद्धा  नागपूर येथील बचाव पथक घटनास्थळी पोहचलं नाही. स्थानिक पातळीवर अजूनही शोध मोहीम सुरू आहे. मात्र नरखेड तहसीदार व गावाकाऱ्यांचा फोनवर झालेला संवाद धक्कदायक आहे.