Nagpur Vagetable Rates : नागपूरमध्ये (Nagpur) भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे दर (Vegetable Rates) गगनाला भिडले आहेत. काल 150 रुपयात विकला जाणार टोमॅटो (Tomato) आज 200 रुपये किलो झाला आहे. फरसबीची किंमत 320 ते 350 रुपयांच्या घरात आहे. बहुतांश भाज्यांची किंमत 100 रुपयांच्या वर पाहायला मिळत आहे. त्यामुळे गटारी अमावस्येनिमित्त मटणामध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा देखील महागल्याने अनेकांचं बजेट कोलमडलं आहे. 


मागील काही दिवसांपासून भाज्यांची आवक होणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत आहे. यामुळेच नागपूरच्या भाजी बाजारात भाज्यांचे दर हे शंभरीच्या पार पोहोचले आहे. तर टोमॅटोचा दर 200 च्या घरात गेला आहे. यामध्ये कोथिंबीर 120 रुपये जुडी तर फरसबी तर 320 रुपये किलोने बाजारात विकली जात आहे.


येत्या मंगळवारपासून अधिक मास आणि श्रावण सुरु होणार आहे. पुढील दोन महिने सणासुदीची दिवस आहेत. त्यात भाज्या महाग झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. शिवाय पुढील काही दिवस भाज्यांची आवक वाढत नाही तोपर्यंत भाज्यंचे दर असेच राहतील असं सांगितलं जात आहे.


भाज्या - दर प्रति किलो


टोमॅटो - 200 रुपये
वाल- 140 रुपये किलो            
फूलकोबी - 80 रुपये किलो
वांगी - 70 रुपये किलो
कोथिंबीर - 120 रुपये जुडी
मिरची- 240 रुपये किलो
आलं - 210 रुपये किलो
पत्ताकोबी - 80 रुपये किलो
दोडका - 130 रुपये किलो
भेंडी - 70 रुपये किलो
मटार - 120 रुपये किलो
भेंडी - 80 रुपये किलो
शिमला मिर- 90 रुपये किलो
चवळीच्या शेंगा - 60 रुपये किलो
पडवळ - 80 रुपये किलो
गवार - 120 रुपये किलो
पालक - 80 रुपये किलो


15 ऑगस्टपर्यंत टोमॅटोचे दर आवाक्यात येणार!


राज्यात टोमॅटोचं पीक घेणारे शेतकरी जून महिन्यात लागवड सुरु करतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटो पट्ट्यात लागवडीला सुरुवात होते. त्यानंतर जवळपास 70 दिवसांनी पीक काढण्यास सुरुवात होते. दरम्यान हे टोमॅटो ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर आवाक्यात येण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 


विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा


विदर्भात यंदा तब्बल 15 दिवसांच्या विलंबाने मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र, अजूनही विदर्भातील अनेक जिल्हे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक दिवस पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 30 ते 43 टक्यांपर्यत पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.


हेही वाचा


Vegetable Price : पावसामुळे भाज्यांचं मोठं नुकसान, मुंबईत आवक घटली, दर 40 टक्क्यांनी वाढले