Vegetable Price : राज्यभरात मागील आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे (Rain) एकीकडे शेतीचं मोठं नुकसान झालं असताना शहरात भाज्यांचे दरही (Vegetable Rates) कडाडल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे मुंबईत (Mumbai) भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर 40 टक्क्यांनी वाढले आहेत. भाजी मार्केटमध्ये फेरफटका मारल्यास भाज्या किती महागल्याचा याचा अंदाज येईल.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून भाज्यांचा पुरवठा होतो. नाशिक, पुणे, गुजरातहून मुंबईत भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या 50 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मुंबईतल्या भाजी मार्केटमध्ये मागील आठवड्याभरापासून राज्यभरात कोसळत असलेल्या पावसामुळे आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. नाशिक, पुणे, गुजरातहून भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत तर पावसामुळे अनेक भाज्या खराब झाल्या आहेत
पावसामुळे पालेभाज्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे जोपर्यंत पूर्वीप्रमाणे भाज्यांची आवक मार्केटमध्ये पूर्ववत होत नाही तोपर्यंत हे दर वाढलेले पाहायला मिळतील
एक नजर टाकूया भाज्यांच्या आधीच्या आणि आताच्या दरांवर
भाजी आताचे दर आधीचे दर
भेंडी 40 रुपये 26 रुपये किलो
टोमॅटो 40 रुपये 24 रुपये किलो
कोथिंबीर जुडी 60-70 रुपये 25 रुपये किलो
मेथी जुडी 70 रुपये 20 ते 25 रुपये
पालक जुडी 50 रुपये 20 रुपये किलो
फ्लॉवर 60 रुपये 26 रुपये किलो
ढोबळी मिरची 90 रुपये 40 रुपये किलो
गवार 60 रुपये किलो 30 रुपये किलो
लिंबू 30 ते 40 रुपये 90 ते 100 किलो