Nagpur News Updates:  आपण जनरली पाहतो की वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंड आकारला जातो. ट्राफिक नियमांचे पालन करणाऱ्यांना तर दंड केला जातो पण नियमांचे पालन करून गाडी चालवणाऱ्या चालकांना आता बक्षीस मिळणार आहे. नागपुरात 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत याबाबत माहिती देण्यात आली आहे.  रस्ते वाहतुक मंत्रालय व नागपूर महानगर पालिका यांच्या सहकार्यातून एका खाजगी कंपनीद्वारे नागपूर शहरात प्रायोगिक स्तरावर पुढील महिण्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचे प्रदर्शनीत माहिती देण्यात आली. या प्रयोगाची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र यावर प्रत्यक्ष अमलबजावणी कशी होते हे पाहणं आता गरजेचं आहे.


ट्राफिक रिवार्ड या ॲपद्वारे नोंदणी करणं गरजेचं...


ट्राफिक रिवार्ड या ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्या वाहनचालकांना त्यांचे वाहनावर लावण्यासाठी एक रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटीफीकेशन डीव्हाइस घरपोच मिळेल. या डिव्हाइसची फ्रीक्वेंसी कॅच करण्यासाठी वेस्ट हाय कोर्ट रोड ते जपाणी गार्डन रोड या मार्गावर प्रायोगिक स्तरावर 10 सिग्नलवर सेंसर लावण्यात आले आहेत. हे सेंसर सिग्नलसोबत जोडण्यात आले असून आपली गाडी लाल, पिवळ्या व हिरव्या सिग्नलचे पालन करते का याची तपासणी करेल. नियमाचे पालन करणाऱ्या वाहनचालकाच्या मोबाईल ॲप खात्यात प्रत्येक सिग्नलवर 10 रिवार्ड पांईट जमा करण्यात येतील. या रिवार्ड पॉइंटचा उपयोग विविध कंपण्यांची उत्पादने खरेदी करतांना सुट मिळविण्यासाठी करता येणार आहे. 


विज्ञान प्रदर्शनीत पहा 'मातीशिवाय शेती'


आता या विज्ञान युगात मातीशिवायदेखील शेती करणे शक्य आहे. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत मातीशिवाय केवळ पाण्याचा वापर करून घरच्या घरी कमीत कमी जागेत, टेरेसवर परसबाग तयार करण्याची माहिती देणारा स्टॉल इ-हॉलमध्ये लावण्यात आला आहे. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे न्युट्रीयन्ट पाण्याचा वापर करून पालेभाज्या, फळभाज्या, फुले, शोभीवंत रोपे यांचे उत्पादन घेता येते. विशेष म्हणजे यात कोणताही रासायनिक खते व किटकनाशकांचा उपयोग न करता केवळ सेंद्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.


ही बातमी देखील वाचा