Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल ओळखले जातात सोबतच ते सरकारी अधिकाऱ्यांना आणि खडेबोल सुनावण्यासाठी सर्वश्रुत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांना सुनावले. सरकारच्या चालणाऱ्या कामांना अधिकारी पंक्चर करतात. फायलींना दाबून ठेवणे योग्य नसल्याचे गडकरी म्हणाले. आमच्या सरकारमध्ये फायनान्शिअल ऑडिट जेवढं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा परफॉर्मन्स ऑडिट हे अधिक महत्त्वाचं असल्याचे ते म्हणाले.
सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सुनावले. आमच्या सरकारमध्ये फायनान्शिअल ऑडिट जेवढं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा परफॉर्मन्स ऑडिट हे अधिक महत्त्वाचं आहे. आमचे चुकीचे निर्णय लोकांना नाहक त्रास देतात. ज्यामुळं लोकांच्या जीवनात कारण नसतानाही समस्या वाढतात असे गडकरी म्हणाले. मी इन्कम टॅक्सची एक केस पाठवली, एका पती-पत्नीने फ्लॅट विकत घेण्यासाठी बँकेतून कर्ज घेतलं, कर्जामध्ये एक एन्ट्री झाली आणि एक झालीच नाही, तर इन्कम टॅक्स विभागाने इन्कम समजून चाळीस लाखांचा टॅक्स लावून दिला. अगोदरच कर्जाचे हप्ते देणे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं अशात अगोदरच चौकशी केली असती तर टॅक्सची रक्कम लावण्यात आली नसती असे उदाहरण देखील त्यांनी सांगितले.
कधी कधी अधिकाऱ्यांच्या छोट्या कामामुळं देशाचं नुकसान
कधी कधी अधिकाऱ्यांच्या छोट्या कामामुळं देशाचं नुकसान होतं आणि जनतेलाही त्रास सहन करावा लागतो असे गडकरी म्हणाले. तुम्ही जे सरकारच्या रोजगारात चालले आहेत त्यांना मी असं म्हणतो की तुमचं परफॉर्मन्स ऑडिट हे अधिक महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. काही लोक असे असतात जे केवळ कायदे आणि नियमांच्या गोष्टी करतात. पण नियमांचं अर्थ असा असतो की लेटर आणि स्पिरिटमध्ये डिफरन्स आणि नियमांच्या स्पिरीटला जे समजत नाही ते काम नाही करु शकत. मी मोठमोठ्या अधिकाऱ्यांना म्हणतो की तुम्ही विआरएस (स्वेच्छा निवृत्ती) का नाही घेत? तुम्ही विभागात आले नाही तरी आमचे काम अधिक गतीने होईल. तुम्ही आल्याने समस्या निर्माण होतात, चालणाऱ्या कामांना तुम्ही पंक्चर करता असे गडकरी म्हणाले.
फाईलला दाबून ठेवणं योग्य नाही
स्वाभाविकपणे पॉझिटिव्हिटी ट्रान्सपरन्सी आणि टाईम बाऊंड डिसिजन मेकिंग हे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जरुर लक्षात ठेवा. जे लोक वेळेत काम पूर्ण करतात ते मला आवडतात असेही गडकरी म्हणाले. आमच्याकडे डिपार्टमेंटमध्ये एक खूप मोठे अधिकारी आहेत. आयआयटीएन आहेत, कोणतीही फाईल त्यांच्याकडे गेली की ते तीन महिने त्याचा अभ्यास करतात. मी त्यांना सांगितले एक रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याचे डायरेक्टर म्हणून जा, इथे तुमची गरज नाही असे गडकरी म्हणाले. फाईलला तीन-तीन चार-चार महिने दाबून ठेवनं हे योग्य नसल्याचे गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: