नागपूर : तुम्ही कुस्तीतील पहेलवान व त्याला लागणारी रोजची  खुराग या बद्दल ऐकले असेल मात्र कोंबड्यांच्या लढाईतील  पहेलवान कोंबडा व त्याच्या खुरगाबाबद्दल ऐकले का ? होय... हे खरंय. नागपुरातील (Nagpur News) कोंबड्याला चक्क रोजच्या खुरागात त्यात अंडी व काजू लागते    त्याशिवाय तो काही खातही नाही.. कोंबड्याच्या या सवयीमुळे मालकाला आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. 


वय वर्ष एक ... वजन पाच किलो  सुलतान असे या कोंबड्याचे नाव आहे.  कोंबड्यांच्या आखाड्यातील पहेलवान म्हणून ओळखला जातो. रोजच्या खुरागात त्याला अंडी आणि काजू लागतात.  सुलतानाचा मालक पण त्याच्यावर तितकाच प्रेम करतो कारण कोंबड्यांच्या लढाईत तो समोरच्या कोंबड्यांना दोन चार पंचमध्ये  चीत करतो. पंचक्रोशीत या सुलतानची चर्चा आहे. त्याला बघायला अनेक जण येतात. त्यामुळे सुलतानाचा मालक देखील त्याच्या खुरागीसाठी कसलीही कमतरता भासू देत नाही 


अतुल दुधखेडे असे या पहलवान कोंबड्याच्या मालकाचे नाव आहे. आतापर्यंत पहलवानने 13 लढाया जिंकल्या आहेत. पहेलवानला दिवसाला एक अंड, काजू, किसमिस आणि बाजरी देण्यात येते. अतुल दुधखेडे यांच्याकडे 25 कोंबड्या आहेत. सर्व कोंबड्यांना लढतीचे सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे.  पहेलवानला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. परंतु सध्या विकण्याची इच्छा नाही, असे मालक अतुल दुधखेडे म्हणाले.


सुलतानच्या या नबाबी तोऱ्याची चर्चा नागपूर जिल्हा परिषदने आयोजित पशु पक्षी प्रदर्शनीमध्ये देखील पाहायला मिळते. त्याला अनेकांनी 25 हजारात मागितले मात्र त्याचा मालकाचे सुलतानवर प्रेम इतके आहे  की कोंबड्याच्या आखाड्यातील या सुलतान पहेलवानाला विकायची इच्छाच होत नाही. दीड कोटीचा रेडा, सव्वा कोटींचं बोकड, दारुचं व्यसन करणारा कोंबडा  याच यादीत आता 25 हजार कोंबड्यांची भर पडली आहे.


भंडाऱ्यातील कोंबड्याला चक्क दारुचं व्यसन


भंडारा शहरानजीक असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे यांच्या कोंबड्याला दारुचे व्यसन आहे.. पेशाने शेतकरी असलेल्या भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद जडल. त्यामुळे त्यांच्याकड़े विविध प्रजातिचे कोंबड़े पहायला मिळतात. सध्या ते आपल्या कोंबडयाच्या दारु पिण्याच्या वाइट सवयीमुळे चिंतेत आहेत.  भाऊ कातोरे आपल्या कोबडयांला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करताय, मात्र कोंबडा पाणी प्यालाही तयार नाही. आता तुम्ही म्हणाल त्याला तहान लागली नसेल. मालक दररोज देशी दारु पाण्यात मिसळून कोंबड्याला पाजतोय.. त्यानंतर कोंबडा अन्न खातोय.   कोंबडयाला मरी रोग जडल्याने खाणं आणि पिणेही सोडले होते.. कुणीतरी यावर मोहफूलाची देशी दारू पाजा असा उपाय सांगितला.. मालकानेही त्याला दारु पाजली.. तेव्हापासून कोंबड्याला दारुचे व्यसन जडलेय. निर्व्यसनी मालकाला कोंबड्याला महिन्याला दोन हजारांची दारु पाजावी लागतेय.