नागपूर : नागपूर महानगरपालिका (Nagpur NMC Elections 2022) निवडणुकीसाठी 31 मे रोजी महिला आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी 10 वाजता महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढली जाईल.
महिला आरक्षणाची सोडतीनंतर बुधवारी 1 जुनला आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या 1 ते 6 जूनपर्यंत महानगरपालिका आयुक्तांकडे किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार असल्याची सूचना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी जारी केली आहे.
'नॉट रिचेबल' नगरसेवकांचे काय ?
2017 च्या मनपा निवडणुकीत अनेक प्रभागात महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या घरातील महिलांना तिकिट मिळवून दिले होते. यापैकी अनेकांनी निवडणूक जिंकली होती. मात्र कोव्हिड काळात अनेक नगरसेवक 'नॉट रिचेबल'असल्याने नागरिकांमध्ये विद्यामान नगरसेवकांबद्दल रोष आहे. त्यामुळे आता या 'नॉट रिचेबल'नगरसेवकांबद्दल पक्ष काय भूमिका घेईल याकडे 'भावी नगरसेवकांचे' लक्ष लागून आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Private travels over charge : जादा तिकीटदर वसूल करणाऱ्या ट्रॅव्हल्सची करा तक्रार