Nagpur: नागपूरच्या रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये लिलावात परस्पर विक्रीला काढण्यात आली आहे . राजे रघुजी भोसले यांच्या 21 वर्षांच्या पराक्रमी कारकीर्दीची साक्ष देणारी ही दुधारी तलवार  एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून लिलावात विकली जाणार असल्याने मोठी खळबळ उडाली आहे .(Rajee Raghujji Bhosale)  ही तलवार परत करण्याची मागणी त्यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी सरकारकडे केली आहे .  


ब्रिटिशांनी नागपुरात 1853 ते 1863 दरम्यान भोसले यांच्या खजिन्याची मोठी लूट केली .या लुटीत ही तलवार ब्रिटिशांकडे गेली असावी अशी शक्यता आहे . या तलवारीवर लिखाण मोडी लिपीमध्ये करण्यात आले. त्या तलवारीवरील नक्षीकाम सोन्याचं आहे. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांची तलवार परस्पर विक्रीला जातेच कशी? असा सवाल उपस्थित केला जातोय .


ती तलवार आमच्याकडे यावी: राजे मुधोजी भोसले


प्रथम रघुजी राजे भोसले यांची ती तलवार आहे. 1853 ते 1863 दरम्यान ब्रिटिशांनी नागपुरात भोसले यांच्या खजिन्याची मोठी लूट केली होती. त्या लुटीमध्ये ही तलवार ब्रिटिशांकडे गेली असावी अशीच शक्यता आहे... दुसरी शक्यता म्हणजे काही तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ती तलवार स्वतःकडे ठेवून नंतर  इंग्लंडमध्ये नेऊन विकली असेल. त्या तलवारीचा लिलाव होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. ती तलवार लिलावाच्या माध्यमातून आमच्याकडे यावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा आहे. अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे.


..अन्यथा लिलावात उतरून तलवार खरेदी करण्याची तयारी


ती तलवार युरोप मध्ये तयार करण्यात आली होती, नंतर मात्र ती रघुजी राजे यांच्याकडे आली.. तेव्हा त्या तलवारीवर लिखाण मोडी लिपी मध्ये करण्यात आले. त्या तलवारीवरील नक्षीकाम सोन्याचा आहे. तलवारीची मूठ ही विशेष आहे.. या तलवारीवर सोनेरी नक्षीकाम मोठ्या प्रमाणावर आहे. सरकारने लिलावामध्ये ती खरेदी करावी, आम्ही सरकारला खरेदीची ती किंमत अदा करू. अन्यथा लिलावामध्ये स्वतः उतरून ती तलवार खरेदी करण्याची ही आमची तयारी आहे. इतिहासाच्या दृष्टिकोनातून ही तलवार महत्त्वाची आहे. ती दुधारी तलवार आहे, त्यास दोन्ही बाजूने धार आहे.. असे राजे मुधोजी भोसले म्हणाले.


हेही वाचा: