नागपूर : इंधनदरातील वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा पर्याय वाहनधारकांसाठी होता. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला नागरिकांना देत असतात. मात्र गडकरींच्याच शहरात सीएनजीच्या दराचा उडाला भडका आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकले जात आहे.
नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे. देशातील सर्वात महागडी सीएनजी हे नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. मुंबईत सीएनजी 80 रुपये दराने विकले जाते. सीएनजी वितरण कंपनी ग्राहकांना सरकारी सबसिडी न देता गॅस विकत असल्याचा ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे एवढ्या महाग दरात सीएनजी विकत घ्यावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. नागपूरचे सीएनजी वितरणाचे कंत्राट हरियाणा गॅस डिस्ट्रीन्यूटर असलेल्या रॉ मॅट कंपनीकडे आहे.
राज्यातील नाहीतर देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात विकला जात आहे. तर राज्यातील सर्वात स्वस्त सीएनजी हे नाशिकमध्ये विकलं जात आहे. नाशिकमध्ये सीएनजीचे दर 67.90 रुपये आहे. महाराष्ट्रात सीएनजी सरासरी 82.60 रुपायांना विकले जात आहे.
राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर
- नागपूर 116 रुपये
- पुणे- 85 रुपये
- पिंपरी चिंचवड- 85 रुपये
- मुंबई 80 रुपये
- नवी मुंबई- 80 रुपये
- ठाणे- 80 रुपये
- नाशिक - 67.90 रुपये
- धुळे- 67.90 रुपये
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
- इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
- इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).