Nagpur District Vidhansabha Results 2024 : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळीचे अंतिम निकाल आता हाती येऊ लागले आहे. अशातच, देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. तर या निकालाच्या अंतिम आकडेवारीनंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कौलनुसार नागपूरच्या 12 मतदारसंघातील अतिशय चुरशीच्या लढतीचे निकाल हाती येत आहे. या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरुद्ध प्रफुल्ल गुडधे पाटील, काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर वि. सलील देशमुख, कामठी विधानसभा मध्ये चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर (काँग्रेस) , विकास ठाकरे(काँग्रेस) विरुद्ध भाजपचे सुधाकर कोहळे इत्यादींसह इतर अनेक दिग्गज नेते यंदा निवडणुकीच्या  रिंगणात उतरून एकमेकांविरुद्ध आव्हान देत असल्याचे चित्र होते. त्यामुळे नागपूरच्या 12 मतदारसंघात महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे निकालाअंती पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान हातीआलेल्या निकालानुसार कोणाकोणाचा विजय निश्चित झाला आहे, तर कुणाला पराभवाला समोर जावे लागले आहे, यातील आकडे पुढे येत आहे.  मात्र यातील अंतिम चित्र हे अंतिम फेरीनंतरच कळू शकणार आहे.    

नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

(Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.)

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी इतर / अपक्ष  विजयी उमेदवार
 1  नागपूर दक्षिण पश्चिम  देवेंद्र फडणवीस (भाजप) प्रफुल्ल गुडधे(काँग्रेस)    देवेंद्र फडणवीस (भाजप)
2 नागपूर दक्षिण विधानसभा  मोहन मते (भाजप) गिरीश पांडव (काँग्रेस) अनुप दुरुगकर (मनसे)  
नागपूर पूर्व विधानसभा   कृष्णा खोपडे (भाजप) दुनेश्वर पेठे (NCP-SP) आभा पांडे (अपक्ष)  
नागपूर मध्य विधानसभा प्रविण दटके (भाजप) बंटी शेळके (काँग्रेस) रमेश पुणेकर (अपक्ष)  
नागपूर पश्चिम विधानसभा  सुधाकर कोहळे (भाजप) विकास ठाकरे(काँग्रेस) प्रकाश गजभिये (बसपा)  
नागपूर उत्तर विधानसभा  डॉ. मिलिंद माने (भाजप) डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)  मनोज सांगोळे (बसपा)  
 काटोल विधानसभा चरणसिंग ठाकूर (भाजप) सलील देशमुख (NCP-SP) अनिल देशमुख (NCP-AP)  
कामठी विधानसभा चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)  सुरेश भोयर (काँग्रेस) विक्रांत मेश्राम (बसपा)   
उमरेड विधानसभा सुधीर पारवे (भाजप) संजय मेश्राम (काँग्रेस) प्रमोद घरडे (अपक्ष)  
10  सावनेर विधानसभा डॉ. आशिष देशमुख (भाजप) अनुजा सुनील केदार (काँग्रेस) घनश्याम निखाडे (मनसे)  
11  हिंगणा विधानसभा समीर मेघे (भाजपा)   रमेशचंद बंग (NCP-SP) डॉ. देवेंद्र कैकाडे (बसपा)  
12  रामटेक विधानसभा  आशिष जयस्वाल (शिंदेसेना) विशाल बरबटे (शिवसेना ठाकरे गट)  राजेंद्र मुळक (अपक्ष) आशिष जयस्वाल (शिंदेसेना)

नागपुरातील 12 मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? 

अशातच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस  (Congress) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत.

विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप आणि महायुतीला अधिक कस लावावा लागणार असल्याचे उघड आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या