Nagpur News नागपूर :  सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका तरुणाने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने संशयित आरोपीचे बिंग फुटले आहे. ही धक्कादायक बाब नागपूरच्या (Nagpur News) पारडी पोलीस स्टेशनच्या (Nagpur Police)हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. न्यायालयाने या संशयित आरोपीला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


इन्स्टाग्रामवरून साधला तरुणीशी संपर्क


मिळालेल्या माहितीनुसार, शिवम शेषराम मेहरा (19, रा. एकतानगर भांडेवाडी पारडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत शिवम मेहरा याने इन्स्टाग्राम वरून संपर्क केला. दरम्यान त्यांच्यात 1 ऑक्टोबर 2023 ते 17  नोव्हेंबर 2023 दरम्यान संभाषण होत राहिले आणि त्याचा फायदा घेत शिवमने अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधली. दरम्यान, त्याच्यात कायम संभाषण होत राहिले. संशयित आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.  मुलगी आपल्या जाळ्यात अडकल्याचे बघून शिवमने युवतीकडे शरीर सुखाची मागणी केली. 


 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी


विश्वास संपादन झाल्याचे बघून संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या राहत्या घरी नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. कालांतराने मुलीची प्रकृती खराब झाली आणि त्यातून ती गर्भवती असल्याची बाब तिच्या आई-वडिलांना कळली. हे समजताच मुलीच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पारडी पोलीस ठाणे गाठून संशयित आरोपीविरुद्ध तक्रार दिली.  प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी शिवमला त्याच्या राहत्या घरून अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पारडी पोलिसांनी संशयित आरोपी शिवमला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करीत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nagpur Crime : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; 29 गुरांची सुटका, लाखोंचा मुद्देमाल जप्त


Mumbai : अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड; चोर समजून मारहाण करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात