Nitesh Rane नागपूर : अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) उत्तर दिले. अमित शाह मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विचारावा, त्यावेळेस ते मातोश्री वर होते का? मी होतो, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांना भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टोला लगावला आहे.
नागपूर (Nagpur) येथे पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सारखा खोटारडा माणूस महाराष्ट्रात नाहीये, हे सगळ्या जनतेला माहित आहे. अमित शाह यांनी दिलेला शब्द पाडण्याची विश्वासार्हता फार मोठी आहे. संजय राऊत म्हणतायेत मातोश्रीत बैठक झाली, असा दावा करत असले तरी संजय राजाराम तिथे होता का? तर हा तिथे नव्हता. तिथे होते असा कुठलंही शब्द दिला नाही. उगाच नाक रगडत शेंबड्या मुलांसारखं बोलण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही, असा पलटवार नितेश राणे यांनी एकेरी उल्लेख करत केला आहे.
...तर फोटोग्राफ जाहीर करावे लागतील
संजय राऊतांच्या शब्दाला महाराष्ट्र सोडा, त्याच्या घरात तरी त्याच्या शब्दाला मान आहे का? असेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत हे जेलमध्ये होते तेव्हा तुमचा भाऊ अमित भाईंच्या घराभोवती किती फिरायचा, त्याचे फोटोग्राफ आम्हाला जाहीर करावे लागतील, असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.
अकोल्यातील हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभागी होणार
आज अकोला हिंदू जन आक्रोश मोर्चा आहे. अकोल्यामध्ये ज्या काही घटना मागील काही दिवसात घडल्या. टिपू सुलतान उदात्तीकरण आणि छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचा बसवण्यासाठी विरोध आहे. सगळ्या विरुद्ध हिंदू समाजाला जागृत करत ताकद देण्यासाठी आज सगळे हिंदुत्ववादी संघटना मिळून मोर्चा काढत आहे. त्यात सहभागी होणार असल्याचेही नितेश राणे म्हणाले.
मुस्लीम आरक्षणावर काय म्हणाले नितेश राणे?
मुस्लीम समाजाला किंवा धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू शकत नाही.हे कोर्टाने स्पष्ट केलेले आहे. मुस्लीम समाजातील असंख्य जाती आहे, त्या जातीचा अभ्यास करून जर आरक्षण मागितलं तर ते शक्य आहे. मुस्लीम धर्म म्हणून मुस्लीम या नावाने आरक्षण मिळू शकत नाही. चुकीच्या पद्धतीच्या मागण्या करू नका चुकीच्या मागण्यांची दखल आमचं सरकार घेणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हीच भूमिका सभागृहात मांडली आहे, असे त्यांनी म्हटले.
...तर त्याचा फायदा जिहाद्यांना होईल
बहुजन समाज म्हणून हिंदू म्हणून कोणीही आपसात लढू नये हीच भूमिका असले पाहिजे. कारण हिंदू समाज म्हणून हे फार मोठे नुकसान आहे. म्हणून जरांगे पाटलांना पण आवाहन करेल हिंदू आपसात लढतील तर त्याचा फायदा जिहाद्यांना होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले, आम्ही लढत आहोत, तुमच्यासारखे *** नाही