नागपूर: विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही (Private Travels)सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येणार आहे. राज्य परिवहन विभागाने (Maharashtra State Transport) या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमानात आपात्कालीन परिस्थितीत काय करावं याची सूचना एअर होस्टेसकडून दिली जाते. तीच पद्धत आता खाजगी बसमध्ये ही बंधनकारक करण्यात येणार आहे. नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली आहे.  


खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवाशांची सुरक्षितता  लक्षात घेता परिवहन विभागाने काही निर्णय घेतले आहे. यामध्ये बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक राहणार आहे. एवढंच नाही तर विमान प्रवासात ज्या पद्धतीने एअर होस्टेस आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे याची  सूचना प्रवाशांना देते. तशाच पद्धतीच्या सूचना बस प्रवास सुरू होण्याआधी प्रवाशांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


खासगी बसच्या दुर्घटनेत वाढ 


मागील काही दिवसात खासगी बसच्या दुर्घटनेत वाढ झाल्याचं चित्र आहे. अनेक नागरिक सोयीसाठी खासजी बसने प्रवास करतात. जास्तीचे भाडे देऊन प्रवास सुखकर होण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र याच बसच्या दुर्घटनेत सध्या वाढ झाली आहे. खासगी बसचा प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


दिवाळीत होणारी लूट थांबवण्यासाठी निर्णय


दिवाळीच्या काळात बस भाड्यामध्ये प्रवाशांची होणारी लूट लक्षात घेता एसटीच्या भाड्यापेक्षा कमाल दीडपट भाडं खाजगी बस वाहतूकदारांना ( ट्रॅव्हल्स कंपनीला ) घेता येईल अशी सूचनाही परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त भाडे घेतल्यास खाजगी ट्रॅव्हल्स विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. सणाच्या तोंडावर खासगी बसचालकांकडून भरमसाठ भाडेवाढ करण्यात येते. त्यामुले दिवाळीचा प्रवासाचा आनंद निघून जातो.तसेच खाजगी वाहनांना खाजगी बसेस आणि ट्रॅव्हल्सला भाडे निश्चिती मोटार ॲक्ट नुसार करण्यात आली असून ती एसटी भाड्यापेक्षा 50 टक्के अधिक आहे म्हणजेच जे एसटीचे भाडे 200 असेल तर तिकीट हे तीनशे रुपये खाजगी बस चालकांना घेता येते.


स्लीपर बसचे अपघात रोखणे (Travels Accident) आणि आपत्कालीन प्रसंगी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना व सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. 


ही बातमी वाचा: