नागपूर : ऐन दिवाळीच्या ( Diwali 2023)  मुहुर्तावर देशासह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणाने( Air Pollution) डोके वर काढले आहे. हिवाळ्याच्या दिवसात (Winter Season) देशाची राजधानी नवी दिल्लीतील (New Delhi) वायू प्रदूषण कायम चर्चेत असते. मात्र आता त्या पाठोपाठ  राज्याची उपराजधानी आणि हिरव्यागार शहरांच्या यादीत कधीकाळी अग्रस्थानी असलेली  नागपूर (Nagpur City ) देखील वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. वाढते वायूप्रदूषण ही धोक्याची घंटा असल्याचे लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court ) या विषयात तातडीने लक्ष घालून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.  राज्य शासनाच्या आदेशानंतर वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासह शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने दिवाळी सणादरम्यान महत्वपूर्ण दिशानिर्देश जारी केले आहे.


दिवाळीसारख्या आनंददायी पर्वावर वायू प्रदूषणमुळे काही निर्बंध लादण्यात आले असल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण आले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नागपूर शहरातील वाढते वायू प्रदूषण लक्ष्यात घेता उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली आले.दिवाळीत फटाके फोडण्यासाठी आता नागपूरकरांना सायंकाळी 7  ते रात्री 10 वाजतापर्यंतची वेळ निर्धारित केली आहे.दिलेल्या वेळेचे पालन न केल्यास  कार्यवाहीच्या दृष्टीने मनपासह नागपूर पोलिस विभागाला उच्च न्यायालयातर्फे सूचना  देण्यात आल्या आहे.


स्प्रिंक्लर्सद्वारे केले जाणार पाणी फवारणी


दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या उद्भवत असते. या शिवाय शहरात सुरू असलेले विकासकामांमुळे देखील वायू प्रदूषणात अधिक भर पडली आहे.त्यावर उपाययोजना करत प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील विविध ठिकाणी स्प्रिंक्लर्सद्वारे पाणी फवारणी केली जाणार आहे. तसेच खाजगी बांधकामस्थळी  कुंपण लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. वाहनातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे देखील वायू प्रदूषणात मोठी वाढ होत असते. त्यामुळे सर्व प्रशासकीय वाहनांची त्या दृष्टीने तपासणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे.


बाजारात हरित फाटक्यांची रेलचेल,क्यू आर स्कॅन करून खरेदी करा फटाके 


 फटाक्यामुळं होणाऱ्या वायू प्रदूषणाची समस्या लक्ष्यात घेता बाजारात हरित फटाक्यांची मोठ्याप्रमाणावर आवक झाली आहे. या हरित फटाक्यांच्या पाकिटावर क्यू आर कोड दिला असून तो स्कॅन केल्यास फटाक्यातील संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे. या फटाक्यांमुळे पर्यावरणाला कुठलाही धोका होत नसून हे फटाके पर्यावरणपूरक असल्याचा दावा करण्यात येत आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


दिवाळीपूर्वीच वायू प्रदूषणाचे सावट 


दिवाळीपूर्वीच शहरातील हवा बदलू लागली आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरासह कचरा जाळणे, बांधकामांमुळे वायू प्रदूषण वाढत आहे.ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वाढला आहे. शहरातील सर्वाधिक हिरवळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिव्हील लाईन्समधील केंद्रावर हवा गुणवत्ता निर्देशांक 241 पर्यंत पोहचल्याचे नोंदवण्यात आले आहे.


हे ही वाचा :


Supreme Court : वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला धरलं धारेवर; 'कधी पाऊस तर कधी हवेमुळे लोकांना दिलासा मिळतो, पण सरकार....'