नागपूर : मालमत्ता कर संकलनात (Property Tax Collection) हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (nmc commissioner) यांनी नेहरूनगर झोनच्या पाच कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. मनपा आयुक्तांनी नेहरूनगर झोनला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.  सेवा पंधरवडा अंतर्गत मालमत्ता कर विभागाच्या सेवा नागरिकांना वेळेवर उपलब्ध करणे आवश्यक आहे. सदर कामात या झोनचे पाच कर्मचारी दिरंगाई करतांना निर्दशनास आले.


नेहरूनगर झोनमधील (NMC Nehru Nagar Zonal Office) 21 हजार थकबाकीदार यांची  15.92 कोटीची मालमत्ता कराची वसुलीकरीता स्थावर मालमत्ता जप्तीची (Asset forfeiture) कारवाई न केल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी नाराजी दर्शविली. आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे गैरजबाबदार कर्मचारी जवाहर धोंगडे, स्वप्नील पाटील, हेमंत चामट यांना नामांतरण संबंधीत अर्ज वेळेवर निकाली न काढल्यामुळे थेट निलंबीत करण्यात आले. अशोक गिरी, राजस्व निरीक्षक, अमित दामणकर कर संग्राहक हे दोन्हीही कर्मचारी बिनापरवानगीने गैरहजर (absent without permission) होते म्हणून या दोघांनाही निलंबीत करण्यात आले.


मालमत्ता कर थकबाकीदारांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश


तसेच कर विभागाकडून (Property tax department) होत असलेल्या कामचुकारपणाबद्दल नेहरुनगर झोनच्या कर विभागाच्या सहायक अधीक्षक अनिल महाजन यांची एक वेतनवाढ (promotion) कायमस्वरुपी रोखण्याचे निर्देश त्यांनी  यावेळी दिले. याशिवाय नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. मालमत्तेचे नामांतरण, कर निर्धारण संदर्भातले प्रलंबित कामे 48 तासाच्या आत करण्याचेही आदेश त्यांनी दिले. झोन अंतर्गत आयुक्तांनी 21 हजार नागरिकांकडून 15.92 कोटीचे मालमत्ता कर वसुल करण्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश दिले.


मनपाच्या रुग्णालयांना द्यावी आयुक्तांनी भेट


आयुक्तांच्या या कारवाईमुळे नागरिकांकडून मनपा आयुक्तांचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे आयुक्तांनी मनपाच्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रावर अशी भेट दिल्यास अनेक कामचुकार कर्मचारी हाती लागतील. तसेच नागरिकांना गृहीत धरणाऱ्यांवर वचक बसेल अशी मागणीही नागरिकांनी केली. तसेच मनपा आयुक्तांनी सेवा पंधरवाडा आहे म्हणून नव्हे तर नियमित अशी पाहणी करावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


IND vs AUS, Head to Head Record : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यांत कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?


Nagpur-Madgaon Train : नागपूर- मडगाव विशेष रेल्वेसाठी आजपासून बुकिंगला सुरुवात