India vs Australia, ODI Record : भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात असून पहिला सामना भारताने गमावला आहे. आता मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रलिया जिंकल्यास मालिकाही ते जिंकतील, तर भारत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजचा सामना खेळणार आहे. त्यामुळे दोघांसाठीही आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा टी20 सामन्यांतील एकमेंकाविरुद्धचा इतिहास कसा आहे जाणून घेऊ...


भारत-ऑस्ट्रेलिया T20 Head to Head


टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत 24 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं काही प्रमाणात जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 13 सामने जिंकले आहेत. तर, 10 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णित देखील सुटला आहे. दरम्यान भारतापेक्षा केवळ तीनच सामने ऑस्ट्रेलियाने कमी जिंकले आहेत, त्यात पहिल्या टी20 मध्ये 209 धावांचे लक्ष्यही ऑस्ट्रेलियाने पूर्ण केलं आहे, अशात हा सामनाही चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. 



भारतीय संघात बदल निश्चित


पहिल्या टी20 सामन्यात मैदानात उतरलेल्या उमेश यादवने तब्बल 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. यावेळी त्याने दोन षटकात 27 रन दिले. त्याने स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल असे महत्त्वाचे विकेट्स घेतले खरे पण त्याने बऱ्याच धावा देखील दिल्या. दुसरीके हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 49 तर भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 52 रन दिले. अशामध्ये भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज बुमराहची कमतरता सर्वांनाच जाणवली. ज्यामुळे दुसऱ्या टी20 मध्ये बुमराह नक्कीच संघात येऊ शकतो.


अशी असू शकते भारताची अंतिम 11


सलामीवीर - रोहित शर्मा, केएल राहुल


मिडिल ऑर्डर फलंदाज - विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक


ऑलराउंडर- अक्षर पटेल


गोलंदाज - भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.  



हे देखील वाचा -