नागपूर : विधिमंडळात कुठल्याही आमदाराचा आवाज दाबला जाणार नाही. मात्र कोणत्याही आमदाराने असंसदीय भाषेचा प्रयोग करून गोंधळ ही घालू नये. आमदारांनी संसदीय आयुधांचा वापर करून मुद्दे उचलावेत अशी अपेक्षा आहे, असे झाल्यास आमदारांना आपल्या समस्या मांडण्याची संधी (winter assembly session nagpur) नक्कीच मिळेल, असे स्पष्ट वक्त्व्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, महाराष्ट्राचे विधिमंडळ देशातील सन्माननीय विधिमंडळ आहे, आणि आपले आमदार जबाबदार आमदार आहेत. त्यामुळे जनतेत विधिमंडळाची प्रतिष्ठा ती कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे. गेल्या अधिवेशनात दर दिवशी साडेनऊ तास काम झालाय. एक ही दिवस गोंधळामुळे वाया गेला नाही. चाळीस लक्षवेधी सूचना आणि इतर अनेक प्रस्ताव चर्चेला घेतले गेले. शासनाने ही त्याला उत्तर दिले. त्यामुळे 'प्रॉडक्टिव्ह' काम अधिवेशनात होऊ शकले. सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांना सहकार्य करून पुढच्या हिवाळी अधिवेशनातही उत्तम असा काम करतील अशी अपेक्षा ही यावेळी नार्वेकरांनी व्यक्त केली.
विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य मिळावं ही भूमिका योग्यच
विदर्भातील प्रश्नांबाबत विचारलेल्या प्रश्नावर (vidarbha development issues) नार्वेकर म्हणाले, अधिवेशन कुठेही असले तरी तारांकित प्रश्न (LAQ) राज्यातील सर्वच विभागाचे असतात. मुंबईत अधिवेशन होतोय म्हणून विदर्भाचे प्रश्न विचारले जाणार नाही असे होत नाही. विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य मिळावं अशी भूमिका असतेच आणि त्यात काहीही वावगं नाही. तसेच अधिवेशन किती दिवसांचा असणार याबद्दल विचारले असता, अधिवेशन 19 डिसेंबर पासून प्रस्तावित आहे. मात्र BAC मध्ये अधिवेशन किती दिवस चालेल, हे निश्चित होईल. अधिवेशन किती दिवस चालेल यापेक्षा महत्त्वाचे असते की अधिवेशनात कामकाज झालं पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखीत केले.
अधिवेशनासाठी अतिरिक्त इमारतीबाबत चर्चा
नागपुरातील (Nagpur) आढाव्यानंतर बोलताना नार्वेकर म्हणाले, यंदा 19 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. गेले दोन वर्ष कोरोना मुळे नागपुरात अधिवेशन होऊ शकले नव्हते. त्यामुळे विधानभवनाची इमारत आणि आमदार निवास या ठिकाणचा आढावा घेणे आवश्यक होता त्याच निमित्ताने आज आढावा घेतला. आमदार निवासातील पहिल्या इमारतीचा नूतनीकरणाचा काम पूर्ण झाला आहे. मात्र दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या इमारतीचे काम अजूनही अपूर्ण आहे. नागपुरातील विधान भवनात दोन्ही सभागृहात नवीन ऑडिओ सिस्टीम (New Audio System) बसवण्यासंदर्भात शिफारस केली आहे. तसेच नागपूरच्या विधानभवनात जागेची कमतरता लक्षात घेता भविष्यात शेजारी काही जमीन अधिगृहीत करून तिथे अतिरिक्त इमारत बनवण्यासंदर्भातही चर्चा झाली.
आमदारांनी आमदार निवासातच राहावे
आमदार निवास (MLA Hostel) आमदारांच्या राहण्याचे ठिकाण असून पुढे आमदार निवासाचे नवीनीकरण किंवा पुनर्विकास केल्यास आणि नागपुरात वर्षातून एकदाच अधिवेशन होत असतानाही आमदार निवास आमदारांच्या राहण्याचे ठिकाण म्हणूनच वापरावे अशी माझी अपेक्षाही यावेळी नार्वेकरांनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या