नागपूरः गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेने सुरु केलेल्या विशेष रेल्वे गाड्यांना मिळत असलेला प्रवाशांचा प्रतिसाद बघता रेल्वेने नागपूर - मडगाव - नागपूर या द्वि-साप्ताहिक (आठवड्यातून दोन वेळा) या रेल्वे सेवेचा विस्तार केला आहे. 


रेल्वेने सुरु केलेली नागपूर - मडगाव रेल्वे


गाडी क्र. 01139  दर शनिवारी (Every Saturday) आणि बुधवारी नागपूर स्थानकावरुन दुपारी 3.05 वाजता निघालेली रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता मडगावला (Madgaon) पोहोचते. तर, दर गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी 7 वाजता मडगाव येथून निघालेली ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता नागपूर (Nagpur Railway Station) स्थानकावर पोहोचत आहे.


मडगाव - नागपूर खालीलप्रमाणे


गाडी क्र. 01140 मडगाव - नागपूर ही विशेष रेल्वे मडगाव जंक्शन येथून 02 ते 30 ऑक्टोबर दरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीचे थांबे खालील प्रमाणे असतील.  


या स्थानकांचा समावेश


या रेल्वेमार्गावर असलेल्या वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, वीरखेड, चिपळूण, सावरदा, अरावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम करमलीसह जागोजागी या रेल्वेगाड्या (Railway Stops) थांबत असल्याने त्या-त्या भागातील प्रवाशांचाही या रेल्वेगाड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे.


या रेल्वेमध्ये एकूण 22 कोच असणार आहे. यात एक दोन टायर एसी, 4 कोच थ्री टायर एसी, 11 कोच स्लिपर, चार कोच सेकंड सिटींग असणार आहे. नागरिकांना या रेल्वेचा अधिक तपशील आणि प्रत्येक स्थानकांची वेळ www.enquiry.indianrail.gov.in  या संकेतस्थळावर मिळेल. तसेच तिकीट बुकिंग 22 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारपासून प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू करण्यात येईल.


गणेशोत्सवासाठी होत्या विशेष गाड्या


मुळची कोकणातील मंडळी रोजगाराच्या निमित्ताने कुठेही राहत असली तरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावाकडे धाव घेतात. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेत प्रवाशांची मोठी गर्दी होते. ते लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव द्विसाप्ताहीक गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या विविध फेऱ्यांसह नागपूर-मडगाव दरम्यान 20 रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या


नागपूर पोलिसांचा 'कनविक्शन फॉर्म्युला' हिट, दोन्ही प्रकरणात नराधमांना सश्रम कारावासाची शिक्षा


Court News : फेसबुक, मेटाला हायकोर्टातून दिलासा, जिल्हा ग्राहक आयोगाच्या आदेशावर स्थगिती