Vijay Wadettiwar on PM Narendra Modi : 2024 मध्ये मोदी तुमची सत्ता येणार नाही, तर राहुल गांधी (Rahul Gandhi) हे 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केला. जेव्हा जेव्हा गांधी घराण्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तो राजकारणातून संपला आहे, हा देशाचा इतिहास आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी का तुम्हाला घाबरतील असेही वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर देशभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आज आंदोलन होत आहे. नागपुरातही काँग्रेसनं राहुल गांधींच्या समर्थनार्थ मोर्चा काढला यावेळी वडेट्टीवार बोलत होते.
आमचे नेत्यांना विचारतात भाजपमध्ये येतो का? नाही म्हटल्यावर ईडीची नोटीस येते. जे जे भाजपमध्ये गेले ते ते शुद्ध झाले का असेही ते म्हणाले. आपलं चुकलं आपण गाफील राहिलो आणि यांची सत्ता आली. मी नेहमी म्हणतो काँग्रेसमध्ये काम करण्याची ताकद दिली पाहिजे, मात्र, आमच्याकडे काहींनी चापलुसी करणाऱ्यांना मोठे केलं. म्हणून हे बोके सत्तेत जाऊन बसले असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
देशात हिटलरशाही सुरु, नितीन राऊतांचा निशाणा
सध्या देशात हिटलरशाही सुरु आहे. हिटलरने त्याच्या देशात अशीच वागणूक केली आणि नंतर त्याला आत्महत्या करावी लागली, असे आपल्या देशात होऊ नये असे म्हणत मंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. आज काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते देशात विविध ठिकाणी रस्त्यावर आले आहे. हे फक्त ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. ईडीचा धाक दाखवून तुम्ही आमदार खासदार विकत घेऊ शकता. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विकत घेऊ शकत नाही. तुम्ही कितीही जोर लावा कितीही नोटीस पाठवा, कितीही आमच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करा मात्र आमचे नेते निडर असल्याचे राऊत म्हणाले. ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमकतेने रस्त्यावर उतरले असते तर देशात आग लागली असती. मात्र देश सुरळीत चालावा, देशातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काँग्रेसने संयम बाळगला असल्याचे नितीन राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Congress Agitation : राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी
- नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी आज ईडीसमोर हजर राहणार; घोषणाबाजी करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात