Nana Patole : 2014 पासून या देशात एक अत्याचारी सरकार आलं. त्यांनी सातत्यानं विरोधकांना टार्गेट करण्याचं काम केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. गांधी परिवाराला टार्गेट करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम या सरकारनं केल्याचं पटोले म्हणाले. देशाच्या संपत्या विकणं, देशाची अर्थव्यवस्था बरबाद करुन देश विकण्याचं काम या सरकारनं केलं असल्याचे पटोले म्हणाले. अशा या अत्याचारी सरकारविरोधी मुंबईत ईडी कार्यालयासमोर आमचं आंदोलन सुरु असल्याचं पटोले म्हणाले.


गांधी परिवाराचं या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान आहे. त्यानंतर हा देश उभा झाला आहे. देश उभा करण्यात गांधी विचार आणि गांधी कुटुंबाचा मोठा आधार असल्याचे पटोले म्हणाले. अशा या परिवाराला टार्गेट करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम केंद्राकडून सुरु असल्याचं पटोले म्हणाले. फक्त काँग्रेस कार्यकर्तेच नाहीतर सामान्य कार्यकर्ते देखील गांधी परिवाराच्या पाठिमागे उभे राहिल्याचे पटोले म्हणाले.


नरेंद्र मोदी सरकारची उलटी गिणती सुरु


नरेंद्र मोदी सरकारची उलटी गिणती सुरु झाली आहे. आज देशभरात काँग्रेसचे आंदोलन सुरु झाले आहे. चौकशी डाकू आणि चोरांची केली जाते. मात्र, सरकारकडून गांधी परिवाराला बदनाम करण्याचं काम सुरु आहे. भाजपचे ऐकमेव टार्गेट हे नेहरु आणि गांधी परिवार असल्याचे पटोले म्हणाले. 


दिल्लीत काँग्रेसं आंदोलन


नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवणार आहेत. याविरोधात काँग्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दिल्लीतही ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरातही काँग्रेसने जोरदार आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे बडे नेते यामध्ये सहभागी झाले आहेत. सुनो तानाशाहा, तोतों से डरा न पाओगे तुम हाथकंडों से हमें झुका ना पाओगे असे म्हणत भाजपविरोधी घोषणाबाजी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार आहेत. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या: