Mission Moon Chandrayaan-3: चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरुप स्थिरावलं आणि संपूर्ण देशानं आनंद साजरा केला. जगभरातून इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रु तराळले. तर अनेकांनी मिठाई, पेढे वाटले. चांद्रयान-3 यशस्वी लँड होण्यासाठी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ रात्रंदिवस झटत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. चांद्रयानासाठी झटणाऱ्या आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील काही शात्रज्ञांनी आपलं मोलाचं योगदान दिलं आहे. चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचाही मोलाचा वाटा आहे. चांद्रयानाच्या सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी ज्या टीमवर होती, त्या टीममध्ये अव्दैतचा सहभाग होता. 


अद्वैत दवने... मुळचा नागरपूरचा. सध्या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. तसं लहानपणापासूनच अव्दैतला अंतरळाबाबत कुतुहल होतं. अखेर वयाच्या बाराव्या वर्षी त्यानं मनाशी पक्कं केलं की, मी शास्त्रज्ञचं होणार. अन् त्यानंतर बरोबर एक तप म्हणजेच, 12 वर्षांनी अद्वैत दवने चांद्रयान-3 मोहिमेत इस्त्रोच्या टीममध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम पाहत होता.  


अद्वैत दवने चांद्रयान-3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता. सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस तो मिशन ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होता. महत्त्वाचं म्हणजे, शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न त्यानं वयाच्या बाराव्या वर्षीच पाहिलं होतं. इयत्ता नववीत असताना नासामध्ये Space Sciense शी संबंधित प्रोजेक्टसाठी त्याला निमंत्रित करण्यात आलं होतं. 


अद्वैतचे वडील डॉ. प्रदीप दवने हे विभागीय फळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहेत, तर आई भारती दवने शिक्षिका आहेत. नागपूरच्या सोमवार शाळेचा विद्यार्थी राहिलेल्या अद्वैतनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे पुढील शिक्षण घेतलं. ऑप्टिकल इंजिनियरिंगमध्ये एम टेक करणारा अद्वैत कॉलेजमध्ये अव्वल राहिला. चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग करता सेन्सरची महत्त्वाची भूमिका होती. या सेंसर टेस्टिंग टीममध्ये अद्वैतचा सहभाग होता. मुलाच्या चांद्रयान तीनच्या मोहिमेतील यशस्वी सहभागनंतर त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता.


चंद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग


भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची... भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेलीय... ऊर आनंदाने भरून आलाय... आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय... 'चांद्रयान-3'नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. 'चांद्रयान-3'च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. आता विक्रमपासून प्रज्ञान रोवर वेगळे झाले असून आपल्या कामाला सुरुवात केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :