Nagpur : आपत्ती निवारण कार्यासाठी मध्यप्रदेश सरकारच्या विनंतीवरून तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपुरातून दोन एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी नागपूर वायुसेनेच्या तळावरून या दोन मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशसाठी उड्डाण केले. मध्य प्रदेशातील विदीशा येथे हे तैनात राहील. यापूर्वी नागपुरातून मदत कार्यासाठी इंदुर येथेही हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते.


जगातील कोणत्याही संरक्षण दलाची सध्याच्या काळात हेलिकॉप्टर शिवाय कल्पनाच करता येणार नाही असे हेलिकॉप्टरचे अनन्य साधारण महत्व आहे. कोणत्याही वातावरणात संचार करणे, 20 किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण करणे, विविध शस्त्रांसह लढणे, लष्कराच्या जवानांची, लष्करी साहित्याची वाहतुक करणे, कोणत्याही ठिकाणी उतरणे, हवेत स्थिर रहाणे अशी विविध क्षमता असलेली बहुउद्देशीय हेलिकॉप्टर जगात अनेक संरक्षण दलांकडे आहेत.


एमआय-17 चे अपग्रेड वर्जन एमआय-17V5


साधारण 1990 च्या दशकात Mi-17 हेलिकॉप्टरचा संरक्षण दलात समावेश झाला. सध्या भारतीय वायू दलाकडे 200 पेक्षा जास्त Mi-17 कार्यरत आहे. यामध्येच Mi-17 ची आधुनिक आवृत्ती असलेले Mi-17V5 हे 100 पेक्षा जास्त आहेत. तर सीमा सुरक्षा दलाकडे एकुण आठ Mi-17 आहेत. साधारण 2008 नंतर Mi-17V5 या नव्या आणि आधुनिक हेलिकॉप्टरच्या आवृत्तीचा समावेश संरक्षण दलात करण्यात आला. रात्रीच्या वेळी किंवा दिवसा अत्यंत प्रतिकुल वातावरणात उड्डाण करण्याचे कसब हे Mi-17V5 कडे आहे.


मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आजच, प्रकरण पटलावर घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता


'मल्टी टास्कींग' एमआय-17


देशातील अति महत्त्वाच्या म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यांना इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी ही Mi-17 वर आहे. याचबरोबर संरक्षण दलातील जवानांची, लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी, विविध लष्करी कारवाईंसाठी याच Mi-17 चा वापर होतो. एवढंच नाही तर शोध आणि सुटकेच्या मोहिमेत तसंच पुर–अतिवृष्टीच्या काळात लोकांना वाचवणे, मदत पोहचवणे अशा नागरी मदत काळात अनेकदा Mi-17 हेलिकॉप्टरने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.


Pune paranay pathole elon musk Meet:पोरानं करुन दाखवलं! पुण्यातील प्रणय पाथोळे इलॉन मस्क यांना भेटायला थेट पोहचला अमेरिकेत; ट्विटरवर झाली होती दोघांची दोस्ती


60 पेक्षा जास्त देशांकडे एमआय-17 चे बळ


Mi-17 हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञान हे पुर्णपण रशियाचे होते. एमआय म्हणजे मिखाइल मिल या रशियन अभियंत्याने 1950 दशकांत हेलिकॉप्टरची निर्मिती केली. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने मिखाइल मिल (Mikhail Mil) यांच्या आद्यअक्षरावरुन हेलिकॉप्टरला एमआय (MI) हे दिलं. या नावावरुन विविध हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. तर याच श्रेणीतले एमआय-17 (Mi-17) हेलिकॉप्टर हे 1977 ते रशियाच्या संरक्षण दलात दाखल झाले. मुळच्या Mi-8 या हेलिकॉप्टरची नवी अपग्रेडेड आवृत्ती म्हणून एमआय-17 कडे बघितलं जातं. लष्करापासून नागरी वापराकरता या हेलिकॉप्टरचा वापर करणे शक्य असल्याने जगात हे हेलिकॉप्टर लोकप्रिय आहे. म्हणूनच सध्या जगातील 60 पेक्षा जास्त देशांकडे एमआय-17 हे हेलिकॉप्टर आहे. तसेच संरक्षण आणि नागरिक सेवेत कार्यरतही आहेत. Mi-17 मध्ये बदलत्या काळानुसार बदल करण्यात आले. यामध्ये अपग्रेडेशन करुन याची उपयुक्तता वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. आत्तापर्यंत सुमारे 15 हजारांवर हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे.