Nagpur News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरालगत (Nagpur City) सर्व सुविधायुक्त असे महारुद्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. 'यशदा' प्रमाणेच या नवीन प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी नागपूर शहराजवळ 100 एकर जागा शोधण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Nagpur Collector) यांना देण्यात आले आहे.


या प्रशिक्षण केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहे. महारुद्र प्रशिक्षण केंद्राच्या पहिल्या टप्प्यातील विविध कामासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असून जागा मिळताच प्रत्यक्षात कामास सुरुवात केल्या जाणार आहे. राज्यातील 1 लाख 92 हजार ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच ग्राम विकासात कार्यरत अधिकारी- पदाधिकारी आदींसह एकूण 2 लाख 92 हजार सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या महारुद्र प्रशिक्षण केंद्राचा उपयोग होणार आहे.


प्रशिक्षणाची उत्तम सोय


या प्रशिक्षण केंद्रात स्क्रीनद्वाररे प्रशिक्षणाची सोय राहणार आहे. याशिवाय प्रशिक्षादरम्यान निवास व्यवस्था सिव्हील लाइन्सच्या आमदार निवासात करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे आमदार निवासाचा चांगला उपयोग होणार आहे. ही योजना ग्राम विकास विभागाची असून सांस्कृतिक विभाग नोडल एजंसी म्हणून हा प्रकल्प साकारणार आहे. 


आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण 


महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार यंदा प्रसिध्द गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान (Nagpur Assembly Session) 21 डिसेंबर रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारंभ नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे करण्याचे नियोजित आहे. दोन दिवसीय भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने जोमात तयारी केली जात असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. युतीचे सरकार असताना 1997 मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. या पुरस्कार विजेत्याला दहा लाख रोख व प्रशस्तीपत्र दिले जाते. 


ट्रायबल ॲण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा


येत्या हिवाळी अधिवेशनात किंवा मार्चच्या अधिवेशनात गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबल ॲण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाला कायदा करावा लागणार आहे. या संबंधित कायदा मंजूर झाल्यानंतर विद्यापीठाला केंद्र सरकारच्या आदिवासी खात्याचा निधी तसेच आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. 


ही बातमी देखील वाचा


Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग उद्घाटनासाठी तयार; झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोरची निर्मिती


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI