Weather : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील दोन दिवस विदर्भासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. त्यामुळं विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी जास्त आहे.

Continues below advertisement


जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून अद्यापही राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळं विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी वाढलं आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्री मान्सुनचा पाऊस होऊन वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमान कमी होत असते. पण यंदा दमदार पाऊस न झाल्यानं तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात उष्णता जास्त जाणवणार आहे.


नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन


मात्र यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण आहे. या परिस्थितीमुळे सन्सट्रोक होण्याची अधिक शक्यता आहे. नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं  नागपूर हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मॅान्सूनवर परिणाम झाला आहे. मॅान्सून लांबल्याने खरीप पेरणीचं नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. 20 जूननंतर विदर्भात मॅान्सून येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.


जोपर्यंत 50 ते 60  टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करु नये


दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली असली तरीही अजून शेतीसाठी पुरक असा पाऊस राज्यात बरसला नाही. हवामान खात्याने देखील जोपर्यंत 50 ते 60  टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : नांदेडमध्ये हळद लागवडीच्या क्षेत्रात घट, लांबलेल्या मॉन्सूनसह कमी दराचा परिणाम