नागपूर : राज्यभरात शिवसेनेकडून शिवभोजन थाळीची  (Shivbhojan Thali)  सेवा पुरवली जाते. या शिवभोजन थाळीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांचे फोटो झळकत असल्याचं पाहायला मिळतं. पण आता हेच फोटो हटवण्याची मागणी सध्या नागपुरातून केली जात आहे.  पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानने ही मागणी केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांना या संर्दभात निवदेन देखील देण्यात आले आहे. 


राज्यभर असलेल्या शिवजभोजन केंद्रावरुन उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवण्यात यावे अशू मागणी या प्रतिष्ठानने केली आहे. राज्यभरात अनेक शिवभोजन थाळी केंद्रावरील फलकावर अजून ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. ते तातडीने हटवण्याची मागणी पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार शिवभोजन थाळी ही योजना गरिबांकरिता राबविण्यात येते. 


उद्धव ठाकरेंचे फोटो हटवण्याची मागणी का?


शिवभोजन थाळी ही गरिबांकरिता राबवण्यात येते. ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या योजनेवर विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे फोटो असणं आवश्यक आहे. अशी मागणी या निवदेनात करण्यात आलीये. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतरही बऱ्याच ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पालकमंत्र्यांचे फोटो लावले आहेत. ते हटवण्याची मागणी सध्या दीनदयाळ प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. 


दर या केंद्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो लावण्यात यावे अशी मागणी या प्रतिष्ठानेने केली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलेले हे निवेदन गांभीर्याने घेतलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शिवभोजन थाळी योजना काय?


गरिबांना, गरजूंनाा सहज आणि अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरु करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे. राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्र चालकांना एका थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना 35 रुपये अनुदान देण्यात येत होते. 


हेही वाचा : 


Nagpur Scam: नकली नोटा शोधायला गेलेल्या ATS च्या हाती असली नोटा, नागपुरात 27.50 लाखांची रक्कम जप्त