नागपूर : अधिवेशन (Winter Assembly Session)  म्हटलं की सभागृहातील वाद आणि आरोप प्रत्यारोप रंगतात. यावेळीही ते रंगतीलच... मात्र सरकारची खरी डोकेदुखी असणार आहे,सभागृहाबाहेर धडकणाऱ्या मोर्चांची... नागपुरात (Nagpur News) यंदा एक नाही, दोन नाही तर, तब्बल शंभर मोर्चे निघणार आहेत. आतापर्यंत 48 मोर्च्यांना प्रशासनाने परवानगी दिली असून 70 मोर्चे हे परवानगीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे विषय , सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व  सांस्कृतिक विषय या मोर्च्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडले जातात. काही विषय निकाली निघतात तर काही प्रतीक्षेत राहतात. मात्र नागपूरच्या विधिमंडळावर निघणारे मोर्चे नेहमी चर्चेचा विषय राहतात. 


 नागपूरचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला सुरु होत आहे . ज्याप्रकारे मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाला घेऊन राज्यच राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. त्यानंतर अनेक नवीन सामाजिक आंदोलने उभे राहिली आहे. बंजारा समाज पहिल्याच दिवशी विधभावनावर बोगस जात प्रमाणपत्रांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीला घेऊन मोर्चा काढत  आहे. गोर सेने संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात मोर्चा काढत आहे. सोबत पहिल्याच दिवशी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा आहे, तांत्रिक अप्रेंटिक्स कंत्राटी कामगारांचा मोर्चे देखील निघणार आहे.


सर्वात मोठा मोर्चा 12 डिसेंबरला


काँग्रेस देखील यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी याा प्रश्नांवर नाना पाटोले यांच्या नेतृत्वात नागपूरच्या रस्त्यावर उतरणार आहे. यासह 11 डिसेंबरला आदिवासी व धनगर समाजाच्या मोर्चांसह  तब्बल 17 मोर्चे निघणार आहे. यासह पुढील काळात कलार समाज, नाभिक समाज, लहुजी सेने यांचे सामाजिक मागण्यांना घेऊन मोर्चे निघणार आहे. शाहीर कलावंताचा मोर्चा देखील सांस्कृतिक मागणीचे प्रतिनिधी करणार आहे. जुनी पेन्शनला घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा मोर्चा 12 डिसेंबरला असणार आहे.


मोर्चांची संख्या 100 च्या वर जाण्याची शक्यता


आतापर्यंत  48 मोर्चांना प्रशासनाने परवानगी दिली असून 70 मोर्चे हे परवानगीच्या प्रक्रियेत असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. त्यामुळे कधी नव्हे इतका 11 हजार पोलीसांचा फौजफाटा यावेळेस नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पोलिस प्रशासनाने लावावा लागला आहे. या वेळेस एकूण मोर्चांची संख्या 100 च्या वर जाण्याची शक्यता आहे. 


हे ही वाचा :